
बेलगाम प्राईड/माजी मंत्री भीमण्णा खंड्रे यांच्या निधनाबद्दल महिला व बालविकास मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांनी शोक व्यक्त केला आहे.
कॅबिनेट सहकारी माननीय वन, पर्यावरण व जीवशास्त्र मंत्री ईश्वर खंड्रे यांचे वडील डॉ. भीमण्णा खंड्रे हे आपल्या समाजातील ज्येष्ठ नेते होते. त्यांनी अध्यक्ष म्हणूनही सेवा बजावली होती. ते आम्हा सर्वांसाठी मार्गदर्शक होते. त्यांच्या निधनाची बातमी समजताच मनाला अतिशय वेदना झाल्या, असे त्यांनी म्हटले आहे.
डॉ. भीमण्णा यांनी हैदराबाद कर्नाटक मुक्ती, कर्नाटक एकीकरण, देशाच्या स्वातंत्र्यलढ्यासारख्या महत्त्वाच्या चळवळींमध्ये सक्रिय सहभाग घेतला होता. शरण श्रेष्ठ म्हणून अखिल भारतीय वीरशैव–लिंगायत महासभेला त्यांनी आपले मोलाचे योगदान दिले. आमदार व मंत्री म्हणूनही त्यांनी राज्यासाठी अपार सेवा केली, असे त्यांनी स्मरण करून दिले.
या दुःखद प्रसंगी परमेश्वर दिवंगत आत्म्यास शांती देवो आणि खंड्रे कुटुंबीयांना ही मोठी हानी सहन करण्याची शक्ती देवो, अशी प्रार्थना मंत्र्यांनी केली आहे.




