
बेलगाम प्राईड : कर्नाटक राज्य मानवाधिकार आयोगाचे अध्यक्ष टी. श्याम भट्ट यांनी बुधवारी बेळगाव येथील जिल्हा (बिम्स) रुग्णालयाला अचानक भेट देऊन पाहणी केली.
प्रसूती आणि बालरोग विभागाला भेट देऊन त्यांनी तिथे उपचार घेत असलेल्या रुग्णांशी थेट संवाद साधला आणि त्यांना मिळणाऱ्या सुविधांची माहिती घेतली. रुग्णालयातील नोंदी आणि कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या कामाचा आढावा घेत त्यांनी प्रशासनाला महत्त्वाच्या सूचना केल्या.
रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता नवीन एमआरआय स्कॅनिंग मशिनसाठी तातडीने प्रस्ताव पाठवण्याचे आदेश त्यांनी दिले. तसेच रुग्णांच्या नोंदणीसाठी अधिक काउंटर सुरू करण्यात यावेत जेणेकरून रांगे थांबण्यासाठी कमी वेळ लागेल असेही त्यांनी सुचवले. विशेषतः जन्म दाखले देण्यास विलंब करू नका अशा कडक सूचना त्यांनी उपस्थित डॉक्टरांना दिल्या.
यावेळी आयोगाचे सदस्य एस. के. वंटगोडी यांनी रुग्णालयात सुरक्षेसाठी सीसीटीव्ही कॅमेरे वाढवण्याविण्यात यावेत तसेच रुग्णांच्या नातेवाईकांसाठी वेटिंग रूमची सोय करण्यास सांगितले. या पाहणी दरम्यान बिम्सचे संचालक डॉ. अशोककुमार शेट्टी, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. जगदीश गाणीग, डॉ. ईरण्णा पल्लेद व इतर कर्मचारी उपस्थित होते.




