
बेलगाम प्राईड / बसमध्ये प्रवासी महिलेकडील सोन्याची साखळी व रोख रक्कम चोरी करताना एका महिलेला मार्केट पोलीस ठाण्याच्या पोलिसांनी शहरातील मध्यवर्ती बस स्थानक येथे रंगेहात पकडले.
अटक करण्यात आलेल्या महिलेचे नाव पद्मश्री मजगावी (रा. लक्ष्मी नगर, हिंडलगा) असे या महिलेचे नाव आहे. ती शहरातील एका नामांकित खासगी शैक्षणिक संस्थेत शिक्षिका म्हणून कार्यरत असल्याचे उघड झाले आहे. शिक्षण देणारीच शिक्षिका चोरी करत असल्याने नागरिकांमध्ये आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
बसमध्ये चढताना होणाऱ्या गर्दीचा फायदा घेत पद्मश्री ही हातचलाखीने चोरी करतेवेळी या महिलेला पोलिसांनी रंगेहात पकडून कारवाई करण्यात आली. सखोल चौकशीत आरोपी महिलेने चोरी केल्याची कबुली दिल्याची माहिती आहे.
दरम्यान, हैदराबादहून पारीशवाडकडे जाण्यासाठी बसमध्ये चढत असताना एका महिलेच्या बॅगेतून सोन्याचे मंगळसूत्र व रोख रक्कम चोरीस गेल्याची तक्रार करण्यात आली होती. पोलिसांनी तपास केला असता चोरी केलेली मंगळसूत्र आरोपीने बसच्या किटकीतून खाली फेकल्याचे निष्पन्न झाले. मात्र, पर्स व रोख रक्कम अद्याप सापडलेली नाही. याबाबत पुढील तपास सुरू असल्याचे फिर्यादी अक्षता यांनी सांगितले.
सध्या आरोपी महिलेला पोलिसांनी ताब्यात घेतले असून, तिच्यामागे कोणते टोळीचे जाळे आहे का तसेच यापूर्वी अशा किती चोरीच्या घटना तिने केल्या आहेत याचा सखोल तपास सुरू आहे. हा गुन्हा बेळगाव मार्केट पोलीस स्थानकाच्या हद्दीत घडला असल्याने मार्केट पोलिसांकात नोंद झाला आहे.




