Uncategorized
Trending

चोरट्याने भुई गल्ली येथील महालक्ष्मी देवीवरील साडेचार लाखाचे चांदीचे दागिने पळविले

बेलगाम प्राईड/ भुई गल्ली येथील महालक्ष्मी मंदिराच्या चोरट्याने मुख्य दरवाजाची कोंडी तोडून मंदिरात प्रवेश केला यानंतर मंदिराच्या गाभाऱ्याच्या दरवाज्याची कोंडी तोडून गाभाऱ्यातील मूर्तीवर असलेले चांदीचे संपूर्ण दागिने चोरट्याने पळविले ही घटना शनिवारी मध्यरात्री घडली असून सकाळच्या वेळी उघडकीस आली. 

देवीच्या मागील बाजूस असलेली चांदीची प्रभावळ, कंबरपट्टा मूर्तीच्या हातातील चांदीची तलवार आणि आशीर्वादाचा हात गळ्यातील मंगळसूत्र असे एकूण जवळपास दीड किलो चांदीचे दागिने त्या चोरट्याने पळविले आहेत. एकूण साडेचार लाखाचे मुद्दल माल चोरीस गेला आहे.

https://www.facebook.com/share/v/1AW7QmQiph/

या घटनेची माहिती मार्केट पोलिसांना कळतच मार्केट पोलीस स्थानकाचे उपनिरीक्षक व त्यांचे सहकारी घटनास्थळी दाखल होऊन तपासणी करून ठसे तज्ञांना पाचारण करण्यात आले त्याने छोट्यांचे आलेले ठसे यांचे नमुने घेतले असून या मंदिरासमोरील असलेल्या सीसीटीव्ही कॅमेरा मध्ये हे चोरटे कैद झाले आहेत याची चित्रफीत पोलिसांच्या ताब्यात असून यावरून चोरट्यांचा शोध घेतला जाणार या घटनेचा पंचकमनामा करून या घटनेचा गुंडा मार्केट पोलीस अंकात नोंदविण्यात आला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!