Uncategorized
Trending

डॉ. प्रभाकर कोरे यांना पद्मश्री पुरस्कार जाहीर झाल्याने आनंद : खास.जगदीश शेट्टर

बेलगाम प्राईड/ केएलई संस्थेचे कार्याध्यक्ष तसेच राज्यसभेचे माजी सदस्य डॉ. प्रभाकर कोरे यांना यावर्षीचा पद्मश्री पुरस्कार जाहीर होणे ही अत्यंत आनंदाची बाब आहे.शिक्षण व समाजाभिमुख कार्यात स्वतःला झोकून देत त्यांनी केएलई संस्थेस अमूल्य योगदान दिले आहे.

वैद्यकीय क्षेत्रातही केएलई संस्थेला राष्ट्रीय पातळीवर ओळख मिळवून देण्यात त्यांची भूमिका अत्यंत महत्त्वाची आहे. शिक्षण क्षेत्रातील त्यांच्या उल्लेखनीय सेवेची दखल घेऊन २०२६ सालचा पद्मश्री पुरस्कार त्यांना देण्यात येत असल्याचा आम्हा सर्वांना अभिमान आहे. त्याचप्रमाणे कला क्षेत्रातील सेवेबद्दल शतावधानी डॉ. आर. गणेश यांना पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.

साहित्य व शिक्षण क्षेत्रातील कार्यासाठी श्री शशी शेखर वेंपती, वैद्यकीय क्षेत्रातील योगदानासाठी डॉ. सुरेश हनगवाडी, समाजसेवा क्षेत्रातील कार्यासाठी डॉ. एस. जी. सुशीलम्मा व श्री अंकेगौडा, विज्ञान व अभियांत्रिकी क्षेत्रातील योगदानासाठी कु. शुभा वेंकटेश अय्यंगार यांना पद्मश्री पुरस्कार जाहीर झाला आहे. तसेच व्यापार व उद्योग क्षेत्रातील योगदानासाठी श्री टी. टी. जगन्नाथन यांना मरणोत्तर पद्मश्री पुरस्कार जाहीर होणे ही अभिमानाची बाब आहे. सर्व पुरस्कारार्थींना मनःपूर्वक अभिनंदन, असे माजी मुख्यमंत्री व बेळगाव लोकसभा मतदारसंघाचे खास. जगदीश शेट्टर यांनी पत्रकात नमूद केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!