Uncategorized
Trending
जाएंट्स ग्रुप ऑफ मेन अध्यक्षपदी लक्ष्मण शिंदे,उद्या रविवारी नूतन कार्यकारिणीचा पदग्रहण समारंभ

बेलगाम प्राईड/ येथील सामाजिक कार्यात अग्रेसर असलेल्या जाएंट्स ग्रुप ऑफ बेळगाव मेन नूतन कार्यकारिणीचा पदग्रहण समारंभ उद्या रविवारी सायंकाळी पाच वाजता कॅम्प येथील मेसोनिक सभागृहात संपन्न होत आहे.
जाएंट्स मेन ग्रुप ऑफ मेनच्या नूतन अध्यक्षपदी लक्ष्मण शिंदे यांची निवड करण्यात आली आहे. उद्या रविवारी संपन्न होत असलेल्या कार्यक्रमाला, जाएंट्स सेंट्रल कमिटीचे सदस्य दिनकर अमीन, जाएंट्स फेडरेशन (६) अध्यक्ष पांडुरंग ताळेबलकर हे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत. त्याचबरोबर मृणालिनी पाटील साखरे या प्रमुख वक्त्या म्हणून उपस्थित राहणार आहेत.




