
बेलगाम प्राईड/ मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांचे चिरंजीव मृणाल हेंबाळकर यांच्या वाहन चालकावर काही युवकांनी चाकूने हल्ला करून जखमी केल्याची घटना मंगळवारी सायंकाळी क्लब रोड येथे घडली या हल्ल्यात बसवंत कडोलकर (वय ३२) रा.बेळगुंदी असे जखमी झालेल्या युवकाचे नाव आहे.
पोलीस सूत्रांनुसार, बसवंत यांनी कार थांबवून वाहनाबाहेर उभे असताना दोन दुचाकीवरून आलेल्या इसमांनी त्यांच्यावर चाकूने हल्ला केला. या हल्ल्यात त्यांच्या छातीवर, खांद्यावर आणि मांडीवर वार झाले असून एकूण चार ठिकाणी जखमा झाल्या आहेत.बसवंत याला तातडीने बेळगाव येथील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून सध्या त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे डॉक्टरांनी सांगितले.

उपायुक्त पोलीस (DCP) आणि सहाय्यक पोलीस आयुक्त (ACP) यांच्यासह वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी रुग्णालयाला भेट देऊन प्रकरणाची पाहणी केली. मृणाल हेब्बाळकर यांनीही रुग्णालयात भेट दिली. या घटनेचा गुन्हा कॅम्प पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आला आहे. पोलीस हल्लेखोरांचा शोध सुरू ठेवला आहे.




