Uncategorized
Trending

खडेबाजारचे पोलीस निरीक्षक श्रीशैल घाबीना निरोप तर नवनियुक्त महंतेश दामण्णावर यांचे स्वागत

बेलगाम प्राईड/ खडेबाजार पोलीस ठाण्याचे बदली झालेली पोलीस निरीक्षक श्रीशैल घाबी यांचा निरोप समारंभ तसेच नवनियुक्त पोलीस निरीक्षक महंतेश दामण्णावर यांचे स्वागत समारंभ आयोजित करण्यात आला.

या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी खडेबाजारचे उपविभागाचे सहाय्यक पोलीस आयुक्त शेखरप्पा होते. यावेळी शांतता कमिटीचे सदस्य विकास कालघटगी, नगरसेवक शंकर पाटील, रणजित चव्हाण-पाटील, शकील मुल्ला, सहाय्यक पोलीस आयुक्त शेखरप्पा तसेच पोलीस ठाण्याच्या कर्मचाऱ्यांनी आपले मनोगत व्यक्त केले.

या समारंभास माजी महापौर मलोजीराव आष्टेकर, अंकुश केसारकर, हाजी नूराणी, भाऊ किल्लेकर, कॅम्प पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक आनंद वांकुड्रे, टिळकवाडी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक परशुराम पुजारी, पोलीस उपनिरीक्षक कट्टिमणी, पोलीस उपनिरीक्षक आनंद अलगोंडी तसेच नागरिक उपस्थित होते. उपस्थित मान्यवरांनी येणारे व जाणारे दोन्ही पोलीस निरीक्षकांचा हार घालून व सन्मान करून गौरव केला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!