
बेळगाव/ बापट गल्ली येथील प्रतिष्ठित व्यक्ती श्रीमती कमल मारुती केसरकर (वय ७३) यांचे रविवार दि.११ रोजी दुःखद निधन झाले. युवा समितीचे अध्यक्ष अंकुश केसरकर यांनी जायंट्स आय फौंडेशनचे संस्थापक अध्यक्ष मदन बामणे यांच्याशी संपर्क साधला आणि नेत्रदानाविषयी सांगितले लागलीच मदन बामणे यांनी केएलई नेत्रपेढीशी संपर्क साधला व नेत्रदानाची प्रक्रिया पूर्ण केली.
कमल केसरकर यांच्या नेत्रदानामुळे नेत्रविद्येचे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना त्याचा लाभ होणार आहे.ही नेत्रदानाची प्रक्रिया डॉ नंदेश डॉ शरद यांनी पूर्ण केली. त्यांच्या पश्चात दोन कर्ते चिरंजीव, एक कन्या जावई, सुना, नातवंडे असा परिवार आहे. अंत्यविधी सोमवार, दि. १२ रोजी सकाळी १०.३० वा. सदाशिव नगर स्मशानभूमी येथे करण्यात येणार आहेत.




