
बेलगाम प्राईड/ दक्षिण महाराष्ट्र शिक्षण मंडळाच्या गौंडवाड येथील महात्मा गांधी हायस्कूल येथे आयोजित एसएसएलसी व्याख्यानमालेचा उद्घाटन समारंभ आज गुरुवारी सकाळी उत्साहात पार पडला.
शाळेच्या सभागृहामध्ये एन.वाय.पिंगट यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आलेल्या या उद्घाटन समारंभास प्रमुख पाहुणे म्हणून कंग्राळी बुद्रुकचे ग्रामपंचायत सदस्य यल्लोजीराव पाटील, अमोल पाटील, प्रशांत पवार आदींसह अगसगे हायस्कूलचे सहशिक्षक वाय. के. पाटील उपस्थित होते. विद्यार्थ्यांच्या स्वागत गीताने कार्यक्रमाची सुरुवात झाल्यानंतर महात्मा गांधी हायस्कूलचे प्रभारी मुख्याध्यापक जी. एस. धामणेकर यांनी उपस्थितांचे स्वागत आणि प्रास्ताविक केले.
व्यासपीठावरील मान्यवरांच्या हस्ते झाडाच्या रोपाला पाणी घालून व्याख्यानमालेचे उद्घाटन करण्यात आले. आपल्या उद्घाटनपर भाषणात यल्लोजीराव पाटील म्हणाले की, चिमणी व सापाची बोधकथा थोडक्यात सांगून दहावीचे वर्ष हे शैक्षणिक क्षेत्रातील महत्त्वाचे वळण असल्यामुळे विद्यार्थ्यांनी आपल्या मधील सामर्थ्य ओळखून आत्मविश्वासाने परीक्षेला सामोरे जावे असे सांगितले. आपल्या समयोचित भाषणात त्यांनी शिक्षणाचे महत्त्व विशद केले. इतर मान्यवरांनी आपले विचार व्यक्त केल्यानंतर अध्यक्षीय भाषणात एन. वाय. पिंगट यांनी मार्गदर्शनपर विचार व्यक्त केले.
याप्रसंगी शिक्षक जी. पी. अगसीमनी, पी.एच.पाटील, यु. बी.बामणे, पी.एम.जाधव, पी.पी.पाटील, पी.आर.पाटील यांच्यासह शिक्षक व इतर कर्मचारी आणि दहावी अर्थात एसएसएलसीचे विद्यार्थी -विद्यार्थिनी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन एस.एस.लाड यांनी केले.शेवटी एस.वाय.आंबोळकर यांनी सर्वांचे आभार मानले.




