Uncategorized
Trending

मानस कराटे स्पोर्ट्स अकॅडमी तर्फे वार्षिक भव्य कराटे बेल्ट वितरण समारंभ संपन्न..

बेलगाम प्राईड /जपान फुनाकोशी शोतोकान कराटे संलग्न मानस कराटे स्पोर्ट्स अकॅडमी बेळगांव यांच्यावतीने वार्षिक कलर बेल्ट व ब्लॅक बेल्ट वितरण समारंभ सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते.रविवार दिनांक 28 डिसेंबर रोजी संत मीरा इंग्लिश मीडियम स्कूल लक्ष्मी नगर हिंडलगा बेळगाव येथे हा कार्यक्रम अत्यंत उत्साहात पार पडला. 

या समारंभामध्ये प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित असलेल्या संत मीरा शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीमती आरती धीरज पाटील यांनी अध्यक्षीय स्थान भूषविले तसेच डॉक्टर शिवाजी कागणीकर, शंकर कांबळे (दलित संघर्ष अध्यक्ष), डॉ. राहुल पाटील, शिक्षिका श्रद्धा चौगुले, श्री अभय पाटील (आरपीडी महाविद्यालयाचे मुख्याध्यापक),. मोहन पवार(बेकिनकेरे) सुनील गावडे (बेकिनकेरे),सोमशेखर मिस्रीगोटि, शंकर हिरामणी , अमृत पाटील ,सचिन पाटील, शाहीर व्यंकटेश देवगेकर, रवींद्र पाटील या मान्यवरांनी उपस्थिती होते.

उत्कृष्ट प्रगती केलेल्या मुलांना कराटेतील सर्वात महत्वाचा ब्लॅक बेल्ट प्रदान करुन गौरविण्यात आले. यामध्ये ऋतुजा कडोलकर, श्रद्धा कडोलकर ,पृथ्वी घेवड ,हर्षाली पाटील ,महादेव बसरीकट्टी,शिवप्रसाद कौजलगी ,कार्तिक भगनाल, सुदर्शन लाठी, ओमकार चलवेनट्टी,सर्वेश कुंडेकर ,अमर मारचुटे, विनायक येळ्ळूरकर, साक्षी कांबळे ,प्रथम पाटील, हे विद्यार्थी ब्लॅक बेल्ट विजेते ठरले.

संस्थेचे अध्यक्ष आणि मानस कराटे स्पोर्ट्स अकॅडमीचे संस्थापक सीहान भरमानी एम पाटील यांच्या अथक परिश्रम आणि मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांनी अनेक प्रात्यक्षिके सादर करुन पालक, मान्यवर आणि प्रेक्षकांची मने जिंकली.

शिस्त संयम शारीरिक तंदुरुस्ती सोबतच स्त्री स्वसंरक्षणासाठीच्या प्रात्यक्षिकांचे प्रदर्शन विद्यार्थ्यांनी केले. मानस कराटे स्पोर्ट्स अकॅडमी चा हा भव्य समारंभ यशस्वी झाल्याबद्दल सर्व प्रशिक्षक पालक वर्ग आणि विद्यार्थ्यांचे भरभरून कौतुक करण्यात येत आहे. कार्यक्रमाचे निवेदन ॲड. तेजस्विनी ॐकार तुमचे यांनी केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!