
बेलगाम प्राईड/ मराठा लाईट इन्फंट्री रेजिमेंटल सेंटर (MARATHA LIRC), बेळगाव येथे 16 फेब्रुवारी ते 17 फेब्रुवारी 2026 या कालावधीत डिफेन्स सिक्युरिटी कोअर (DSC) मध्ये भरतीसाठी रॅली आयोजित करण्यात येणार आहे. ही रॅली फक्त मराठा लाईट इन्फंट्रीचे माजी सैनिक सेना / टेरिटोरियल आर्मी (TA) कर्मचारी यांच्यासाठी असून, सोल्जर जनरल ड्युटी (GD) आणि सोल्जर क्लार्क (SD) या पदांसाठी आहे.
सोल्जर जनरल ड्युटी (GD) पदासाठी पुनर्नियुक्तीची तारीख माजी सेवेतील निवृत्तीच्या तारखेपासून दोन वर्षांच्या आत असावी. भरतीच्या तारखेस उमेदवाराचे वय सोल्जर GD साठी 46 वर्षांखालील आणि सोल्जर क्लार्क (SD) साठी 48 वर्षांखालील असावे.
DSC मध्ये सोल्जर जनरल ड्युटी व सोल्जर क्लार्क (SD) म्हणून भरती होण्यास इच्छुक व पात्र उमेदवारांनी 16 फेब्रुवारी 2026 रोजी सकाळी 8- 00 वाजता मराठा इन्फंट्री बेळगाव येथे हजर राहावे.




