
बेलगाम प्राईड: येळ्ळूर विभाग महाराष्ट्र एकीकरण समितीच्या वतीने मराठी सन्मान यात्रेचे प्रमुख नेते शुभम शेळके यांचे येळ्ळूर येथील शिवसेना चौकात जल्लोषात स्वागत करण्यात आले. यावेळी “हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे की जय” तसेच “बेळगाव–कारवार–बिदर–भालकीसह संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे” अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला.
कार्यक्रमाची सुरुवात येळ्ळूर विभाग म.ए. समितीचे नेते व येळ्ळूर ग्रामपंचायतीचे माजी अध्यक्ष सतीश पाटील यांच्या प्रास्ताविकाने झाली. त्यानंतर येळ्ळूर विभाग म.ए. समितीचे अध्यक्ष विलास घाडी यांनी समितीचा जाहीर पाठिंबा व्यक्त केला. ग्रामपंचायतीचे उपाध्यक्ष प्रमोद पाटील यांनी मनोगत व्यक्त केले, तर कार्याध्यक्ष भुजंग पाटील यांनी शुभम शेळके व त्यांच्या सहकाऱ्यांचे स्वागत करून शुभेच्छा दिल्या.
यावेळी हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेचे पूजन शुभम शेळके यांच्या हस्ते करण्यात आले. आपल्या भाषणात त्यांनी येत्या २६ जानेवारी २०२६ रोजी होणाऱ्या मराठा सन्मान यात्रेस येळ्ळूर मधून मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन केले. “मराठी माणसाची ताकद दाखवा,” असे सांगत युवकांमध्ये त्यांनी उत्साह निर्माण केला.
मराठी माणसाची आन, बाण आणि शान दर्शविणारा भगवा ध्वज यावेळी शुभम शेळके यांना सुपूर्द करण्यात आला. हा ध्वज रायगडावर फडकवण्याचा संकल्प उपस्थितांनी व्यक्त केला.
कार्यक्रमाला माजी अध्यक्ष शांताराम कुगजी, वाय. सी. इंगळे, परशराम घाडी, लक्ष्मण मेलगे, मनोहर पाटील, ग्रामपंचायत सदस्य परशराम परीट, रमेश मेनसे, पिंटू चौगुले, रामदास धुळजी, निखिल पाटील, शुभम जाधव, मधु य. पाटील, यल्लप्पा बिर्जे, मनोहर घाडी, प्रशांत भाटकांडे, युवराज घाडी, आनंद घाडी, सिद्धार्थ पाटील, बाळकृष्ण पाटील, सागर शहापुरकर, श्रीकांत नांदूरकर, नितीन कुगजी, रमेश कुगजी, महेश कुगजी, प्रभाकर मंगणाईक, विलास यरमालकर, गणेश कुगजी, स्वराभ जाधव, चेतन देवलतकर, स्वराभ कुगजी, मंथन खदरवाडकर, राहुल कुगजी, श्री मास्टमार्डी, बाळू धामनेकर, चांगप्पा धामनेकर यांच्यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.कार्यक्रमाचे आभार येळ्ळूर विभाग म.ए. समितीचे सचिव राजू उघाडे यांनी मानले.




