मस्णांगाई सौहार्द सोसायटीच्या वतीने शिवाजी दादा कागणीकर यांचा भव्य सत्कार
बेळगाव ग्रामीण सामाजिककार्य

बेलगाम प्राईड/ पर्यावरणप्रेमी ज्येष्ठ समाजसेवक तसेच नुकतेच राणी चन्नम्मा विद्यापीठाकडून मानद डॉक्टरेट पदवीने सन्मानित करण्यात आलेले शिवाजी दादा कागणीकर यांचा भव्य सत्कार मस्णांगाई सौहार्द सहकारी सोसायटीच्या वतीने आयोजित करण्यात आला आहे.
मस्णांगाई सौहार्द सोसायटीकडून दरवर्षी गुणी विद्यार्थ्यांचा सत्कार केला जातो. त्याच धर्तीवर यंदा समाजकार्याला आयुष्य वाहून घेतलेल्या ज्येष्ठ समाजसेवक शिवाजी दादा कागणीकर यांच्या कार्याचा गौरव करण्यात येणार आहे.
हा सत्कार सोहळा रविवार, दिनांक १८ जानेवारी रोजी सकाळी ११.०० वाजता, चलवेनहट्टी येथील मराठी शाळेच्या प्रांगणात होणार आहे. या कार्यक्रमास सोसायटीचे चेअरमन, व्हा. चेअरमन, सेक्रेटरी, सर्व संचालक व सल्लागार मंडळ तसेच कर्मचारी वर्ग उपस्थित राहणार आहेत.
तरी या कार्यक्रमास सामाजिक कार्यकर्ते, पंचक्रोशीतील नागरिक, गावातील युवक मंडळे, महिला मंडळे तसेच सर्व नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन श्री मस्णांगाई सौहार्द सहकारी सोसायटीच्या वतीने करण्यात आले आहे.




