
बेलगाम प्राईड /नगरसेवक रवी धोत्रे यांनी आपल्यावर केलेले आरोप तथ्यहीन आहेत पुरव्यनिशी आरोप सिद्ध करण्याची सूचना महापौरानी नगरसेवक धोत्रे यांना करावी अन्यथा त्यांच्यावर मानहानीचा दावा दाखल करू असा इशाऱ्याचे निवेदन पालिकेचे महसूल उपायुक्त उदय कुमार तळवार यांनी महापौराना दिले आहे. तळवार यांनी मंगळवारी मागणीचे निवेदन महापौर मंगेश पवार त्यांच्या नावे सत्ताधारी गटाचे नेते अँड हनुमंत कोंगाली यांच्याकडे सुपूर्त केले.
सोमवार दिनांक 12 रोजी झालेल्या महापालिकेच्या सर्वसाधारण सभेमध्ये नरसेवक रवी धोत्रे यांनी आपल्यावर बिनबुडाचे आरोप केले त्याच दिवशी तालुका पंचायत कार्यालयात नगर विकास खात्याच्या बैठकीला आपण हजर राहिल्याने महापालिकेच्या सर्वसाधारण सभेला आपल्याला हजर राहणे शक्य झाले नाही. वीरेश गदगीन यांनी पालिकेचे आर्थिक नुकसान केल्याने त्यांना सेवेतून कमी करण्यात आले होते मात्र गदगीन यांना महसूल उपायुक्त तळवार यांनी पुन्हा सेवेत घेऊन सार्वजनिक बांधकाम खात्यामध्ये त्यांची नियुक्ती केली आहे. त्यांना सेवेत दाखल करून घेणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी धोत्रे यांनी केली सुरेश गदगीन यांना आपण सेवेत दाखल करून घेतले असल्याचा पुरावा नगरसेवक धोत्रे यांनी सादर करावा त्याचबरोबर मालमत्ते संबंधीचे अर्ज फेटाळण्याचा पुरावा सादर करावा असे महसूल उपायुक्त तळवार यांनी आपण दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.




