नगरसेवक नितीन जाधव यांच्या पाठपुराव्याला यश; हिंदवाडी सर्विस रोडचे पेव्हर्सचे काम पूर्ण

बेलगाम प्राईड / महापालिकेच्या प्रभाग क्रमांक २९ अंतर्गत येणाऱ्या हिंदवाडी येथील चौथा व पाचवा क्रॉस परिसरातील सर्व्हिस रोडवर गेल्या अनेक वर्षांपासून अस्वच्छतेचे साम्राज्य पसरले होते. या भागात कचरा साचणे व चिखलामुळे नागरिकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत होते. ही समस्या तब्बल ७० वर्षांपासून जशास तशी होती.
स्थानिक रहिवाशांनी या सर्व्हिस रोडची स्वच्छता करून त्याठिकाणी पेव्हर्स बसविण्याची मागणी वारंवार केली होती. या मागणीची दखल घेत नगरसेवक नितीन जाधव यांनी अभय पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली,महापालिकेकडे सातत्याने पाठपुरावा केला. त्यांच्या प्रयत्नांमुळे अखेर भंगी पॅसेज परिसरात पेव्हर्स बसविण्याचे काम पूर्ण करण्यात आले आहे.

पेव्हर्स बसविल्यामुळे परिसरातील अस्वच्छता दूर होण्यास मदत झाली असून नागरिकांना दिलासा मिळाला आहे. अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेली समस्या मार्गी लागल्याने स्थानिक नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे. या वेळी नागराज एच. व्ही., रविकुमार पुजारी, निखिल बाचुलकर, हलदणकर, ममता पुजारी, अपराजिता सुरुटेकर यांच्यासह अन्य नागरिक उपस्थित होते.




