
बेलगाम प्राईड/ बेळगाव जिल्ह्याचे नूतन जिल्हा पोलीस प्रमुख रामराजे यांनी गुरुवारी रात्री साडेआठ वाजता आपल्या पदाची सूत्रे स्वीकारली अतिरिक्त जिल्हा पोलीस प्रमुख आर.बी बसर्गी यांनी त्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले जिल्ह्यातील सर्व पोलीस उपाधीक्षक यावेळी उपस्थित होते.
सूत्रे स्वीकारल्यानंतर पत्रकारांची बोलताना रामराजन यांनी बेळगाव मोठा जिल्हा आहे. या जिल्ह्याची जबाबदारी सरकारने आपल्यावर सोपविली आहे. समर्थपणे काम करायचे आहे. असे त्यांनी सांगितले प्रशिक्षणार्थी असताना आपण पाच दिवस बेळगावला आलो होतो. हुबळी धारवाडचे पोलीस उपायुक्त म्हणूनही आपण सेवा बजावली आहे. त्यामुळे या परिसराबद्दल आपल्याला थोडीशी कल्पना आहे. कोणत्याही घटनेनंतर एफ आय आर दाखल होणे आपण गरजेचे समजतो गुन्हेगारी घटने संबंधी पंचायत बसविणे योग्य नाही.
एफ आय आर दाखल करूनच कायद्याच्या मार्गाने तपास करणे आपण पसंत करतो जिल्ह्यातील पोलीस ठाण्यांना भेटी देऊन नागरिकांच्या समस्या जाणून घेणार आहोत पोलीस ठाण्यात समस्यांचे निवारण झाले नाही तर अशा लोकांनी आपल्याकडे यावे आपल्याला भेटण्यासाठी कोणाच्या शिफारसी ची गरज नाही पोलीस आपली जबाबदारी पार पडतील नागरिकांनाही जबाबदारी ओळखून निमाचे पालन करावे दुचाकी चालवताना हेल्मेट परिधान करावे असे आवाहन रामराजे यांनी केले.




