
बेलगाम प्राईड/ एळेबैल गावात आयोजित करण्यात आलेल्या सामूहिक श्री जगद्गुरू तुकाराम गाथा पारायण व भव्य रिंगण सोहळा कार्यक्रमात महिला व बालविकास मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर सहभागी झाल्या.
वारकरी संप्रदायाच्या या अद्भुत परंपरेचे साक्षीदार होत, त्यांनी भजन-पारायणात सहभाग घेतला. श्री विठ्ठल-रुक्मिणीचे आशीर्वाद घेत सर्वांच्या कल्याणासाठी प्रार्थना केली.
संक्रांतीच्या शुभेच्छा
मकर संक्रांती सणानिमित्त हुक्केरी तालुक्यातील अंगणवाडी कार्यकर्त्या बेळगाव येथील गृहनिवास कार्यालयात येऊन मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांना शुभेच्छा देत सन्मान केला.
यावेळी महिला व बालविकास विभागाचे जिल्हा उपसंचालक चेतनकुमार, बेळगाव ग्रामीण बालविकास प्रकल्प अधिकारी सुमित्रा, खानापूर तालुक्याचे सहाय्यक बालविकास प्रकल्प अधिकारी विक्रम तसेच इतर मान्यवर उपस्थित होते.




