
बेलगाम प्राईड/ एक्यूस लिमिटेड च्या संचालक मंडळाने कंपनीच्या मॅन्युफॅक्चरिंग ऑपरेशन्सच्या सुरुवातीपासून एकूस उभारणी व विस्तारामधील त्यांच्या मोलाच्या भूमिकेची दखल घेत, व्यवस्थापकीय संचालक राजीव कौल यांना औपचारिकरित्या कंपनीचे सह-संस्थापक (Co-Founder) म्हणून मान्यता दिली आहे.
या निर्णयाची घोषणा करताना एक्यूस लिमिटेड चे संस्थापक, कार्यकारी अध्यक्ष व मुख्य कार्यकारी अधिकारी अरविंद मेलीगेरी यांनी सांगितले की, कंपनीच्या स्थापनेपासूनच राजीव कौल हे एक्यूस च्या जडणघडणीत महत्त्वाचे भागीदार राहिले आहेत. अनेक आव्हानांच्या काळात त्यांनी ऑपरेशन्सचे नेतृत्व केले आणि ऐक्यूस च्या दीर्घकालीन दृष्टीसाकारात महत्त्वाची भूमिका बजावली, असे त्यांनी नमूद केले. त्यांच्या सातत्यपूर्ण योगदानाशिवाय कंपनीची वाढ शक्य झाली नसती, असेही त्यांनी स्पष्ट केले.
राजीव कौल यांनी भारतातील पहिल्या एकात्मिक एअरोस्पेस उत्पादन परिसंस्थेच्या उभारणीत केंद्रीय भूमिका बजावली आहे. त्यांनी कोप्पळ टॉय क्लस्टरच्या विकासातही महत्त्वाचे योगदान दिले आहे तसेच हुबळी ड्युरेबल गुड्स क्लस्टरमधील ग्राहक (कन्झ्युमर) परिसंस्थेच्या वाढीस मार्गदर्शन केले आहे, ज्यामध्ये Aequs चा ग्राहक इलेक्ट्रॉनिक्स क्षेत्रातील प्रवेशही समाविष्ट आहे. याशिवाय, ते ऐक्यूस च्या संयुक्त उपक्रम (Joint Venture) कंपन्यांच्या संचालक मंडळावरही कार्यरत आहेत.
ऐक्यूस लिमिटेड बद्दल
ही अभियांत्रिकी-आधारित, उभ्या पातळीवर एकात्मिक (व्हर्टिकली इंटिग्रेटेड) अचूक घटकांची उत्पादक कंपनी असून ती एअरोस्पेस आणि ग्राहक क्षेत्रांना सेवा पुरवते. कंपनी तीन खंडांमध्ये एकात्मिक उत्पादन परिसंस्था चालवते, ज्यामुळे जागतिक OEM ग्राहकांना उच्च अचूकतेची, गुंतागुंतीची उत्पादने कार्यक्षमतेने पुरवणे ऐक्यूस ला शक्य होते.




