
बेलगाम प्राईड/ रामघाट (गणेशपूर) लष्करी विभागातील रस्त्याचे डांबरीकरण मात्र इतर भागाच्या रस्त्याकडे प्रशासनाची दुर्लक्ष करण्यात आल्याने नागरिकांतून नाराजी
रामघाट (गणेशपूर) हा रस्ता शंभूअप्पा मंदिरा पासून स्कीम नंबर 51 डबलरोड रस्त्यापर्यंत संपूर्ण रस्त्याची दुरअवस्था झाली आहे. या रस्त्यावरून ये जा करणाऱ्या नागरिकांचे मोठ्या प्रमाणात हाल होत आहेत मात्र एम एस विभागाने शौर्य चौकापासून मराठा हाऊसपर्यंतचा भागाच्या रस्त्याचे डांबरीकरण करण्यात आले आहे.
मात्र उर्वरित रस्त्याकडे दुर्लक्ष करण्यात आले असून परिणामी इतर रस्त्याची अवस्था अत्यंत दयनीय झाली असून रस्त्यावर मोठे खड्डे पडून पृष्ठभाग आणि खडी पसरली आहे. त्यामुळे या मार्गावरून दररोज ये जा करणाऱ्या दुचाकी वाहन चालक आणि सायकल वरून जाणाऱ्या शालेय विद्यार्थ्यांना व नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे.
खराब रस्त्यामुळे मोठी कसरत करत वाहन चालवावे लागत असून अपघाताचा धोका वाढला आहे. विशेषतः सायंकाळनंतर रात्रीच्या वेळी हा रस्ता अधिकच धोकादायक बनत असल्यामुळे वाहन चालक विशेष करून दुचाकी वाहन चालकांसह पादचाऱ्यांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे. तसेच सदर रस्त्याचे विकास काम तात्काळ हाती घेऊन रस्ता रहदारीसाठी सुरक्षित करावा अशी मागणी सामान्य नागरिकांतून केली जात आहे.




