
बेलगाम प्राईड/ रोटरी क्लब ऑफ बेळगाव साऊथतर्फे पत्रकार दिनाचे औचित्य साधून पत्रकारांचा आरोग्यविमा प्रमाणपत्र देवून सन्मान करण्यात आला. हा कार्यक्रम टिळकवाडी येथील लायन्स भवन येथे सोमवारी (दि.12) झाला.
रोटरी साऊथचे अध्यक्ष डॉ. गोविंद मिसाळे यांनी बोलताना वृत्तपत्रांचे स्वातंत्र्य हा असा अनमोल विशेषाधिकार आहे, ज्याशिवाय कोणताही देश राहू शकत नाही. रोटरी आणि पत्रकारितेची मूल्ये एकमेकांच्या खूप जवळ आहेत. फेक न्यूज आणि अफवांद्वारे पसरवल्या जाणाऱ्या चुकीच्या माहितीच्या युगात, तथ्यांची पडताळणी करण्याचे पत्रकारांसमोर आव्हान आहे. पत्रकार आवाज नसलेल्यांना आवाज आणि लोकशाहीला आवश्यक संतुलित दृष्टिकोन देतो. आज पत्रकारांना ‘ब्रेकिंग न्यूज’ची घाई आणि 24 तासांच्या बातम्यांच्या चक्राचा दबाव सहन करावा लागतो. पत्रकारांचा आणि सत्याचा शोध घेण्याच्या वृत्तीचा सत्कार करणे हा रोटरी साऊथसाठी बहुमान आहे. असे सांगितले. इव्हेंट चेअरमन जगदीश कारजार यांनी पत्रकारांना आरोग्य विम्यातून मिळणाऱ्या लाभाची माहिती दिली. रोटरी व्यावसायिक सेवेचे संचालक सतीश कुलकर्णी यांनी मनोगत व्यक्त केले.
यावेळी मान्यवरांच्या हस्ते पत्रकारांना आरोग्य विमा प्रमाणपत्र, भेटवस्तू व पुष्पगुच्छ देवून सन्मानित करण्यात आले. पत्रकार श्रीकांत काकतीकर, ज्ञानेश्वर पाटील, परशराम पालकर, सुहास हुद्दार, अक्षता नाईक, महेश काशीद, अनंत कुचेकर, संजय चौगुले, सुभाणी मुल्ला, दीपक सुतार, सुनील चिगुळकर, विवेक गिरी, प्रसन्ना कुलकर्णी, रुपा कुलकर्णी आदींचा सन्मान करण्यात आला.सचिव प्रणव पित्रे यांनी आभार मानले.




