
बेलगाम प्राईड : सार्वजनिक वाचनालयाच्यावतीने दिला जाणारा ‘सार्वजनिक वाचनालय बेळगाव पत्रकार पुरस्कार २०२५’ जाहीर करण्यात आला आहे. मराठी विभागासाठी सुशांत यल्लाप्पा कुरंगी (प्रतिनिधी, दैनिक तरुण भारत, बेळगाव) तर कन्नड विभागासाठी मंजुनाथ एच. पाटील (जिल्हा प्रतिनिधी, पावर टी.व्ही., बेळगाव) यांची निवड करण्यात आली आहे.
तसेच ‘प्रा. एस. आर. जोग महिला पत्रकार पुरस्कार २०२५’ मराठी विभागासाठी सौ. अक्षता वामन नाईक (जिल्हा प्रतिनिधी, पुढारी न्यूज टी.व्ही., बेळगाव) आणि कन्नड विभागासाठी सी. विमला सी. चिनकेकर (चिक्कोडी प्रतिनिधी, दैनिक होसदिगंत) यांना जाहीर करण्यात आला आहे.
या पुरस्कारांचे स्वरूप रोख रक्कम, मानचिन्ह व प्रशस्तीपत्र असे आहे. हे सर्व पुरस्कार रविवार, दिनांक १८ जानेवारी २०२६ रोजी सायंकाळी ५.३० वाजता मराठा मंदिर, खानापूर रोड, गोवावेस, बेळगाव येथे आयोजित बॅ.नाथ पै व्याख्यानमालेच्या उद्घाटन सोहळ्यात सन्मानपूर्वक प्रदान करण्यात येणार आहेत.




