Uncategorized
Trending

शहर विभागात विविध ठिकाणी विराट हिंदू मेळावा यशस्वी

बेलगाम प्राईड/ता.18: हिंदूत्व हे देशभक्तीचे नाव असून पुजा पध्दती नव्हे, हिंदू शब्दाचा मूळ अर्थ सिंधू हिंदुत्व म्हणजे राष्ट्रीयता, संस्कृती आहे. आज विविध जाती, धर्म असले तरी देशातील सर्वांचे मूळ सनातन हिंदू असून असे प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रांत कार्यकारिणी सदस्य रविंद्र यांनी केले.

कॅम्प विभागात विराट हिंदू मेळावा रविवारी (ता.18) रोजी बी. के. मॉडेल शाळेच्या मैदानावर सायंकाळी पार पडला. यावेळी रविंद्र बोलत होते. त्यांनी पंचपरिवर्तन यावर मार्गदर्शन केले.

मेळाव्याच्या पूर्वी टिळक चौक येथून भव्य शोभायात्रा काढण्यात आली. यामध्ये महिलावर्गांसह विविध चित्ररथांचा समावेश करण्यात आला होता. टिळक चौकापासून पोस्टमन सर्कल, स्टेशन रोड मार्गे ही शोभायात्रा शाळेच्या मैदानापर्यंत पोहोचली.

यावेळी व्यासपीठावर काडसिद्धेश्वर मठ, जारकीहोळी येथील कृपानंद स्वामी, नागनाथ स्वामी , आर. एन. हारगुडे, अपराजिता धिंडोरे उपस्थित होते.

कृृपानंद स्वामी यांनी हिंदू धर्माची व्याख्या करताना जगातील सर्वश्रेष्ठ धर्म म्हणून सनातन हिंदू असल्याचे सांगितले. छत्रपती शिवाजी महाराज, धर्मवीर संभाजी महाराज यांच्या शौर्यकथा आपल्या मुलांना सांगाव्यात, असे आवाहन केले. अपराजिता धिंडोरे यांनीही विचार मांडले. आर. एन. हारगुडे यांनी स्वागत व प्रास्तावित केले. परिणिता पाटील यांनी सुत्रसंचालन केले. महेश पावले यांनी आभार मानले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!