
बेलगाम प्राईड/ महिला व बालविकास मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांनी सुळगा गावातील लक्ष्मी गल्ली येथे सुरू असलेल्या रस्ता विकास कामाची स्वतः प्रत्यक्ष ठिकाणी जाऊन पाहणी केली.
सोमवारी सकाळी गृह कार्यालयात नागरिकांच्या भेटी घेतल्यानंतर तसेच उचगाव येथे नरेगा कामगारांशी संवाद साधल्यानंतर, जेवणही न करता दुपारी सुमारे 3 वाजता त्या सुळगा गावात दाखल झाल्या. घटनास्थळी ग्रामपंचायत कर्मचारी आणि ठेकेदारांना बोलावून सुमारे एक तासाहून अधिक काळ रस्त्यावर पेव्हर्स बसविण्याच्या कामाची पाहणी केली.
कामाबाबत अनेक सूचना व मार्गदर्शन देत त्यांनी गुणवत्तेबाबत कोणतीही तडजोड स्वीकारली जाणार नाही, असे स्पष्ट केले. ठरलेल्या वेळेत दर्जेदार काम पूर्ण करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या.मंत्री सायंकाळी सुमारे 4.30 वाजता घरी परतल्या नंतर घराजवळ वाट पाहत बसलेल्या नागरिकांच्या तक्रारी ऐकून घेतल्या




