
बेलगाम प्राईड/ हावेरी जिल्ह्यातील होसळी (ता. हावेरी) येथील रहिवासी व मूळच्या बैलहोंगल शहरातील शांतम्मा रुद्रप्पा अंगडी (वय ७५) यांचे काल (दि. १२ जानेवारी २०२६) निधन झाले. त्यांच्या अंतिम इच्छेनुसार डॉ. रामण्णावर चॅरिटेबल ट्रस्ट, बैलहोंगल यांच्या माध्यमातून देह वैद्यकीय शिक्षणासाठी दान करण्यात आला.
त्यांचा देह हुबळी, जिल्हा धारवाड येथील के.एल.ई. जगद्गुरू गंगाधर महास्वामीगाळू मूरसाविरमठ वैद्यकीय महाविद्यालय (JGMMMC) यांना सुपूर्द करण्यात आला. यावेळी रुग्णालय प्रशासन संचालक डॉ. व्ही. डी. पाटील, प्राचार्या शारदा मेटगुड, तसेच डॉ. महंतश रामण्णावर व डॉ. रामण्णावर चॅरिटेबल ट्रस्टचे सचिव यांनी अंगडी कुटुंबीयांचे मनःपूर्वक आभार मानले. स्व. शांतम्मा अंगडी यांच्या पश्चात दोन पुत्र व दोन कन्या असा परिवार आहे. डोळे, त्वचा व देहदानाबाबत अधिक माहितीसाठी डॉ. रामण्णावर चॅरिटेबल ट्रस्टशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.




