Uncategorized
Trending

व्हॅक्सिन डेपो परिसरात हेरॉईन विक्री करणारा युवक पोलिसांच्या ताब्यात

बेलगाम प्राईड /बेळगाव शहरातील टिळकवाडी येथील व्हॅक्सिन डेपो परिसरात सार्वजनिक ठिकाणी हेरॉईनची विक्री करणाऱ्या एका युवकाला बेळगाव सीसीबी पोलिसांनी अटक केली आहे. या कारवाईत आरोपीकडून सुमारे २१,८०० रुपये किमतीची हेरॉईन पावडर व अन्य साहित्य असा एकूण २६,९७० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव जावेद इलियास बेंडीगेरी (वय २९, रा. बाबली गल्ली, अनगोळ, बेळगाव) असे आहे. सीसीबी पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक मंजुनाथ भजंत्री व त्यांच्या सहकाऱ्यांनी मिळालेल्या गुप्त माहितीनुसार टिळकवाडी येथील व्हॅक्सिन डेपो परिसरातील रंगमंदिराजवळ छापा टाकून ही कारवाई केली.

पोलिसांनी आरोपीकडून सुमारे १० ग्रॅम वजनाच्या १०९ पुड्यांमध्ये भरलेली हेरॉईन (किंमत २१,८०० रुपये), ५,००० रुपये किमतीचा मोबाईल फोन तसेच १७० रुपये रोख रक्कम जप्त केली आहे. या प्रकरणी जावेद बेंडीगेरी याच्यासह मुंबईच्या सायन कोळीवाडा परिसरातील एका महिलेविरुद्ध टिळकवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, अंमली पदार्थांच्या साखळीचा शोध घेण्यासाठी पुढील तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!