Uncategorized
Trending

विजेच्या धक्क्याने शाळकरी विद्यार्थीनीचा सांबरा येथे मृत्यू

बेलगाम प्राईड / विजेच्या धक्क्याने शालेय विद्यार्थिनीचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना शुक्रवारी सकाळी सांबरा येथे घडली. या घटनेमुळे संपूर्ण गावात शोककळ वातावरण पसरले आहे.परिनीती चंद्रू पालकर (वय 13) रा. महात्मा फुले गल्ली, सांबरा) असे मृत विद्यार्थिनीचे नाव आहे.

परिनीती ही सांबरा येथील सरकारी मराठी प्राथमिक शाळेत सातवी इयत्तेत शिक्षण घेत होती. शुक्रवारी सकाळी घरातील पाण्याची मोटर सुरू करत असताना अचानक तिला विजेचा धक्का बसला. आणि ती खाली कोसळली या घटनेची माहिती आजूबाजूला कळताच तातडीने सर्वजण गोळा होऊन तिला युवकांनी तत्काळ खाजगी रुग्णालयात दाखल केले.

डॉक्टरांनी लगेचच तिच्यावर उपचार करण्यासाठी घेतल्या असता परिनीती ही युवती मृत झाली असल्याने घोषित केले.परिनीतीच्या घरच्या लोकांना याचा धक्का बसला तिच्या पश्चात आई, वडील, भाऊ आणि आजी असा परिवार आहे. या घटनेचा गुन्हा मारीहाळ पोलीस स्थानकात नोंद झाला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!