Uncategorized
Trending

विविध दोन ठिकाणी घातलेल्या धाडीत मटका व जुगार खेळणाऱ्या 6 जणांना अटक 

बेलगाम प्राईड / विविध दोन ठिकाणी मटका व जुगार खेळत असलेल्या ठिकाणी पोलिसांनी धाड घालून एकूण सहा जणांना अटक करून त्यांच्या जवळील 19 हजार 602 रुपये रोख व मटक्याचे व जुगाराचे साहित्य पत्ते जप्त करण्यात आल्याची कारवाई एपीएमसी पोलिसांनी केली. 

एपीएमसी व मार्केट यार्ड अशा ठिकाणी मटका व जुगार खेळत असल्याची माहिती पोलिसांना कळताच पोलिसांनी धाड घालून मटका खेळणाऱ्या आणि जुगार खेळणाऱ्या सर्वांना अटक करून त्यांच्या जवळील रोख १९६०२ रुपये जप्त करून मटक्याच्या चिटिया व जुगाराचे साहित्य जप्त केल्याची कारवाई एपीएमसी पोलिसांनी केली.

मटका खेळणाऱ्या विनायक तेजस कुमार कोलकार (वय 19) रा. रामनगर तिसरा क्रॉस कंग्राळी के एच हा युवक मटका वेळी पोलिसांनी त्याला अटक केली. त्याच्याजवळून मटक्याचे चिट्ट्या व रोख रक्कम 1000 रुपये जप्त करण्यात आली आहे.

तर किरण सुरेश बजंत्री (वय 27) राहणार एपीएमसी मार्केट यार्ड कंगराई के एच.,मारुती भरमा रजाई (वय 31) रा. कंग्राळी के एच सागर नगर, शुभम कृष्णा कडीमणी (वय 27) रा. कंग्राळी के.एच. अनुप महादेव कंभीर (वय 47) रा. एपीएमसी मार्केट यार्ड कंग्राळी, विनायक मोतीराम सोनारवाडी (वय 41) रा. ज्योती नगर मार्केट यार्ड कंग्राळी, या सर्व जणांना अटक करून त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ही कारवाई एपीएमसी चे पोलीस निरीक्षक यांच्या नेतृत्वाखाली पोलीस उपनिरीक्षक एस आर कट्टी सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक जी एल कोटबागी व त्यांचे सहकारी पोलीसानी ही कारवाई केली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!