Uncategorized
Trending

दक्षिणकाशी कपिलेश्वर येथे महाशिवरात्री उत्सव : पोलीस व सुरक्षा अधिकाऱ्यांचा पाहणी दौरा

बेलगाम प्राईड/बेळगाव येथील श्रीक्षेत्र दक्षिणकाशी कपिलेश्वर मंदिराच्या वतीने साजरा होणाऱ्या श्री महाशिवरात्री महोत्सवाच्या पार्श्वभूमीवर आज पोलीस व सुरक्षा यंत्रणांकडून पूर्वतयारीची पाहणी करण्यात आली.

दरवर्षीप्रमाणे यंदाही मोठ्या भक्तिभावाने व उत्साहात महाशिवरात्री महोत्सव साजरा करण्यात येणार असून, भाविकांना कोणतीही गैरसोय होऊ नये यासाठी प्रशासनाकडून विशेष उपाययोजना करण्यात येत आहेत. याच अनुषंगाने आज पोलीस अधिकाऱ्यांनी मंदिर परिसरासह भाविकांच्या हालचालींचा मार्ग, सुरक्षा व्यवस्था व इतर नागरी सुविधांचा आढावा घेतला.

या पाहणी दौऱ्यात खडेबाजार पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक महांतेश द्यामणावर, एक्स्ट्रीम सिक्युरिटीचे रघुनाथ देसाई, महापालिकेचे अधिकारी आनंद पिंपळे तसेच श्री कपिलेश्वर ट्रस्टचे अध्यक्ष राहुल कुरणे यांच्यासह ट्रस्टचे अभिजीत चव्हाण, विवेक पाटील, प्रथमेश कावळे, ज्योतिबा कावळे, संतोष देवर आदी उपस्थित होते.

महोत्सव काळात भाविकांची मोठी गर्दी होण्याची शक्यता लक्षात घेता, सुरक्षा, वाहतूक नियोजन, स्वच्छता व आपत्कालीन व्यवस्थेबाबत संबंधित विभागांना आवश्यक सूचना देण्यात आल्या असल्याचे अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!