Uncategorized
Trending

आंतरराष्ट्रीय जलतरण स्पर्धेत मयांक हलदर याला दोन सुवर्णपदके

बेलगाम प्राईड/ चेन्नई येथे संपन्न झालेल्या आंतरराष्ट्रीय एशिया पॅसिफिक डाऊन सिंड्रोम फेडरेशन तर्फे आयोजित केलेल्या जलतरण स्पर्धेसाठी भारतासह इतर दहा देशातील जलतरपटूंनी भाग घेतला होता. मयांक हलदर आंतरराष्ट्रीय पातळीवर दोन सुवर्णपदके पटकाविली.

या आंतरराष्ट्रीय स्पर्धेत बेळगावच्या मयांक हलदर याने भारताचे प्रतिनिधित्व केले त्याने 50 मीटर फ्रीस्टाइल व 25 मीटर बॅक स्ट्रोक या दोन्ही स्पर्धे मध्ये सुवर्णपदक मिळवून त्याने बेळगावचे नाव संपूर्ण देशात तसेच आंतरराष्ट्रीय पातळीवर चमकविले आहे.

आज रविवारी या स्पर्धा संपून रेल्वेने बेळगावला आगमन होताच रेल्वे स्थानक येथे त्याच्या नातेवाईकांनी गुलाबाच्या फुलांच्या पाकळ्या त्याच्यावर उधळून त्याचे स्वागत केले तसेच आबा स्पोर्ट्स क्लब व हिंदी स्पोर्ट्स क्लब, क्रीडा भारती बेळगाव यांच्यातर्फे त्याचा बेळगाव रेल्वे स्टेशनवर आगमन होताच त्याला शाल पुष्पगुच्छ देऊन त्याला पेढा भरून त्याचा सन्मान करण्यात आला.

यावेळी मयांकचे आई-वडील तसेच आबा स्पोर्ट्स क्लब चे जलतरण प्रशिक्षक विश्वास पवार, विशाल वेसने, शुभांगी मंगळूरकर, ज्योती पवार, सुधीर धामणकर, मोहन पत्तार , सूर्यकांत हिंडलगेकर, पद्मप्रसाद हुली, गणेश दडीकर, हर्षाली पाटील, अनंत पाटील व इतर मान्यवर क्रीडाप्रेमी उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!