Uncategorized
Trending

आरोग्यदायी राष्ट्रासाठी सशक्त भविष्य : मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांचे मत

महिला मानसिक आरोग्य शिखर परिषदेचे उद्घाटन

बेलगाम प्राईड/ आरोग्यदायी कुटुंबे आरोग्यदायी राष्ट्र घडवतात आणि आरोग्यदायी राष्ट्र सशक्त भविष्य निर्माण करते, असे महिला व बालविकास मंत्री लक्ष्मी हेंबाळकर यांनी सांगितले.

बेंगळुरू येथील खासगी हॉटेलमध्ये शुक्रवारी आयोजित Mpowering Minds 2026 – Women’s Mental Health Summit या महिला मानसिक आरोग्य शिखर परिषदेचे उद्घाटन करताना त्या बोलत होत्या. आरोग्यदायी महिला आरोग्यदायी कुटुंबांची निर्मिती करतात, असे त्यांनी नमूद केले.

मानसिक आरोग्य क्षेत्रात दहा वर्षांपासून सातत्याने सेवा देत असलेल्या Mpower संस्थेचे त्यांनी मनःपूर्वक अभिनंदन केले. आजचे बेंगळुरू हे विचारांचे, नवोपक्रमांचे आणि वेगळ्या पद्धतीने विचार करण्याच्या धैर्याचे शहर आहे. महिलांच्या मानसिक आरोग्यासाठीही आज हाच दृष्टिकोन आवश्यक आहे — बोलण्याचे धैर्य, ऐकण्याचे धैर्य आणि कृतीत उतरवण्याचे धैर्य. मानसिक आरोग्य ही दुर्लक्ष करण्याची बाब नसून जीवनाशी संबंधित महत्त्वाचा विषय आहे, असे त्यांनी सांगितले.

महिला या कुटुंब, समाज आणि कार्यक्षेत्राचा कणा आहेत. मात्र त्यांच्या सामर्थ्यामागे एक निःशब्द ओझे दडलेले असते — भावनिक ताण, जबाबदाऱ्या, अपेक्षा आणि त्याग. अनेक हास्यवदनांच्या मागे ताण लपलेला असतो. अनेक सक्षम महिला अदृश्य संघर्षांना सामोऱ्या जात आहेत, असे त्यांनी मत व्यक्त केले.

शैक्षणिक ताणाला सामोरे जाणाऱ्या मुलीपासून ते नोकरी आणि घर यांचा समतोल साधणाऱ्या महिलांपर्यंत, जीवनातील बदलांना सामोऱ्या जाणाऱ्या मातांपासून ते एकटेपणाचा अनुभव घेणाऱ्या वृद्ध महिलांपर्यंत — प्रत्येक टप्प्यावर नवी आव्हाने उभी राहतात, असे मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांनी सांगितले.

अभ्यासानुसार आपल्या राज्यात हजारो महिला मानसिक आरोग्य समस्यांचा सामना करत आहेत. ही केवळ आकडेवारी नाही, तर ती जीवने, कुटुंबे आणि भवितव्ये आहेत. ही समस्या एकट्या एखाद्या संस्थेकडून सुटू शकत नाही. एका मनाला आधार देण्यासाठी संपूर्ण समाजाची गरज असते. सरकारची जबाबदारी आहे, संस्थांची जबाबदारी आहे आणि समाजाचीही जबाबदारी आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.

महिलांसाठी सरकारच्या विविध योजना

राज्य सरकारकडून महिलांसाठी अनेक योजना राबविण्यात आल्या आहेत. महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी पंच गॅरंटी योजना लागू करण्यात आल्या आहेत. गृहलक्ष्मी योजनेअंतर्गत महिलांना दरमहा दोन हजार रुपये दिले जात आहेत. तसेच शक्ती योजनेद्वारे राज्यभर महिलांसाठी मोफत बस प्रवासाची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. महिला सक्षमीकरण हेच आमचे ध्येय आहे, असे मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांनी सांगितले.

यावेळी Neerja Birla (आदित्य बिर्ला एज्युकेशन ट्रस्टच्या संस्थापक), National Institute of Mental Health and Neurosciences च्या संचालिका डॉ. प्रतिमा मूर्ती, तसेच मानसिक आरोग्य तज्ज्ञ इमोन मॅक क्रोरी, पीटर फोनागी, डॉ. श्याम भट, डुरू शहा आदी मान्यवर उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!