Uncategorized
Trending

बेळगाव हॉकी संघाला सुवर्णपदक विविध संघांच्या तर्फे सत्कार

बेलगांम प्राईड/ हॉकी बेळगावने बेळगावची परंपरा कायम राखून नुकत्याच झालेल्या दिल्ली येथील हॉकी स्पर्धेत सुवर्णपदके मिळवून इतिहास घडवला आहे. हॉकी बेळगावच्या एस्ट्रोटर्फ मैदानाचे स्वप्न हाती घेऊन पुढे नेण्यास चालना देऊ. हॉकी बेळगावला एक परंपरा असून ती परंपरा हॉकी बेळगावने कायम राखावी यासाठी आम्ही सकल मराठा समाजाच्या वतीने पाठिंबा देऊ असे आश्वासन श्रीराम सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष रमाकांतदादा कोंडुसकर यांनी दिले.

प्रारंभी हॉकी बेळगावचे उपाध्यक्ष प्रकाश कालकुंद्रीकर यांनी हाॅकी बेळगावतर्फे प्रस्तावना व पाहुण्यांचे स्वागत केले. सचिव सुधाकर चाळके यांनी हाॅकी संघाची विजयी संघाची सविस्तर माहिती दिली.

भारत सरकारच्या क्रीडा खात्यातर्फे अखिल भारतीय नॅशनल हाॅकी चॅम्पियनशिप 2026 या स्पर्धेचे आयोजन 5 फेब्रुवारी ते 10 फेब्रुवारी आयोजित करण्यात आले होते या स्पर्धेत हॉकी बेळगावच्या मुलांचा व मुलींच्या संघाने रोहतक व सोनीपत संघावरती मात करून सुवर्ण पदक मिळवले याबद्दल आज सकल मराठा समाज, श्रीराम सेना हिंदुस्तान व बेळगाव जिल्हा बॉडी बिल्डर्स व स्पोर्ट्सच्या वतीने हॉकीपटूंचा सत्कार समारंभ लेले मैदानावर संपन्न झाला.

बेळगावने भारताला ऑलम्पिकवीर दिले असून तीच परंपरा पुढे हॉकी बनवणे न्यावी. हॉकी बेळगांवने दिल्लीत सुवर्णपदक मिळवून पुन्हा एकदा आपले वर्चस्व राखले आहे याबद्दल अभिनंदन असे रणजीत चव्हाण पाटील यांनी सांगितले.

यावेळी सकल मराठा समाजाचे समन्वयक संजय सातेरी, सागर पाटील, सुनिल बोकडे, श्रीधर खन्नूकर, मनोहर सांबरेकर, भरत नागरोळी, उद्योजक अमोल देसाई, बेळगाव जिल्हा बॉडी बिल्डर्स व स्पोर्ट्सचे कार्याध्यक्ष अनिल अंबरोळे, हाॅकी बेळगावच्या उपाध्यक्षा पूजा जाधव, नामदेव सावंत, मनोहर पाटील, सविता वेसणे, सविता हेब्बार, प्रशिक्षक उत्तम शिंदे, राजू देशनूर, प्रशांत मंकाळे, आनंद रत्नापगोळ आदी उपस्थित होते. शेवटी माजी उपमहापौर संजय शिंदे यांनी आभार मानले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!