Uncategorized
Trending

बेळगाव पोलीस आयुक्त कार्यालयातील संगमेश यांची आंतरराष्ट्रीय स्तरावर गगनभरारी

बेलगाम प्राईड / बेळगाव शहर पोलीस आयुक्तालयातील सीएआर विभागात कार्यरत असलेले आरएसआय संगमेश यांनी आंतरराष्ट्रीय स्तरावर आपल्या कौशल्याचा ठसा उमटवला आहे.

श्रीलंकेतील कोलंबो येथे पार पडलेल्या मानाच्या ‘आयर्न मॅन ७०.३’ या स्पर्धेत त्यांनी उल्लेखनीय कामगिरी करत यश संपादन केले.आरएसआय संगमेश यांनी प्रतिकूल परिस्थितीत ही स्पर्धा यशस्वीपणे पूर्ण करून शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या आपली क्षमता सिद्ध केली आहे. त्यांच्या या कामगिरीमुळे बेळगाव शहर पोलीस दलासह राज्य पोलीस विभागाच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेल्याचे पोलीस आयुक्तालयाने म्हटले.

स्पर्धेच्या दिवशी कोसळणाऱ्या मुसळधार पावसाचे आव्हान स्वीकारत संगमेश यांनी सायकलिंग आणि २१ किलोमीटरची धावण्याची शर्यत अत्यंत कमी वेळेत पूर्ण केली. पोलीस दलातील कामाचा व्याप सांभाळून त्यांनी केलेल्या या कष्टामुळे ते तरुण पिढीसाठी आदर्श ठरले असल्याची भावना पोलीस विभागाने व्यक्त केली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!