Uncategorized
Trending

बेळगाव शहरासाठी 100 इलेक्ट्रिक बसेस, खास. कडाडी यांची माहिती

बेलगाम प्राईड/ केंद्र शासनाच्या महत्त्वकांक्षी पीएम ई बस सेवा योजनेअंतर्गत बेळगाव शहराच्या सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेला मोठा दिलासा मिळणार आहे. बेळगाव शहरासाठी 100 इलेक्ट्रिक बसेस मंजूर करण्यात आलेल्या आहेत अशी माहिती राज्यसभेचे खासदार इराण्णा कडाडी यांच्या कार्यालयाकडून देण्यात आली आहे.

सध्या नवी दिल्ली येथे संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू आहे. या अधिवेशनादरम्यान खासदार कडाडी यांनी बेळगाव शहरासाठी इलेक्ट्रिक बस सेवा संदर्भात प्रश्न उपस्थित केला होता.त्यावर उत्तर देताना केंद्रीय गृहनिर्माण आणि नगर व्यवहार राज्यमंत्री तोखन साहू यांनी, बेळगाव शहरासाठी इलेक्ट्रिक बसेस तसेच त्यासोबत आवश्यक पायाभूत सुविधा मंजूर करण्यात आल्याची अधिकृत माहिती दिली आहे.या अंतर्गत बेळगाव शहरात नियंत्रण कक्ष व इतर पायाभूत सुविधांच्या विकासासाठी केंद्र सरकारने 6.85 कोटींचा निधी मंजूर केला आहे.

इलेक्ट्रिक बस सेवेच्या अंमलबजावणीसाठी आवश्यक चार्जिंग पॉइंट व्यवस्था,डेपो सुविधा,त्तांत्रिक यंत्रणा उभारण्यात येणार आहेत. दरम्यान कर्नाटक राज्यातील एकूण दहा शहरांसाठी 750 इलेक्ट्रिक बसेस मंजूर करण्यात आलेल्या आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!