बेळगावच्या कवयित्री पूजा भडांगे या ‘साहित्य ध्यास सर्जन ते संपादन’ या विषयावर चर्चा

बेलगाम प्राईड/ लोकमान्य ग्रंथालय प्रणित बुक लव्हर्स क्लबच्या येत्या शुक्रवारच्या कार्यक्रमात (दि. ०६ फेब्रुवारी) बेळगावच्या कवयित्री पूजा भडांगे या ‘साहित्य ध्यास: सर्जन ते संपादन’ या विषयावर बोलणार आहेत.
पूजा भडांगे या एक सर्जनशील कवयित्री म्हणून आपल्याला परिचित आहेत. त्यांचा ‘ऐहिकाच्या मृगजळात’ हा कवितासंग्रह 2022 मध्ये प्रकाशित झाला. या कविता संग्रहाला अनेक पुरस्कार प्राप्त झाले आहेत. यामध्ये दक्षिण महाराष्ट्र साहित्य सभा कोल्हापूर यांचा विशेष काव्यसंग्रह पुरस्कार तसेच नरेंद्र विद्यापीठ संस्था, कोल्हापूर यांचा डॉ. न. ना. देशपांडे उत्कृष्ट काव्यसंग्रह पुरस्कार आहेत. साहित्य अकादमीच्या महत्वाच्या अश्या ‘युवा पुरस्कार २०२४ आणि २०२५’ साठी या कवितासंग्रहास नामांकन मिळाले होते.
कवयित्री, शिक्षिका, कॉपीरायटर असा सुरु झालेला हा प्रवास आता माई पब्लिकेशन्स या प्रकाशन संस्थेच्या प्रकाशिका या भूमिकेपर्यंत आला आहे. या प्रवासाबद्दल तसेच रुंदावत जाणाऱ्या जाणिवांसोबत कवितेचे देखील परिपक्कव होणे, एक कवयित्री म्हणून सतत विकसित होत जाणारी आणि सखोल होत जाणारी सर्जनशील प्रक्रिया, तसेच एका कवीकडून संपादकाच्या भूमिकेत झालेला बदल आणि या दोन्ही भूमिकांचा समतोल राखण्याचा प्रयत्न याविषयी त्या बोलणार आहेत. त्याचसोबत त्यांच्या अलीकडील कवितांवरही त्या प्रकाश टाकणार आहे.
लक्षात असू द्या हा कार्यक्रम येत्या शुक्रवारी, ०६ फेब्रुवारी रोजी, संध्याकाळी ठीक ०६ वाजता लोकमान्य ग्रंथालय, वरेरकर नाट्यसंघ सभागृह येथे होणार आहे.




