Uncategorized
Trending

डीवायसी ज्युडो खेळाडूंची शालेय राष्ट्रीय स्पर्धेत कांस्य पदकांची हॅट्ट्रिक

बेलगाम प्राईड/ दिल्ली येथील त्यागराज स्टेडियम येथे दिनांक 29 जानेवारी ते 4 फेब्रुवारी 2026 दरम्यान आयोजित करण्यात आलेल्या19 वर्षाखालील शालेय राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत डीवायसी बेळगावच्या तीन ज्युडो खेळाडूंनी कर्नाटक राज्याचे प्रतिनिधित्व करत उत्कृष्ट कामगिरी नोंदवली. त्यांनी एकाच दिवशी कांस्य पदकांची हॅट्ट्रिक करत जिल्ह्याचे नाव लौकिक केले आहे.

स्पंदना सी.एस. – 40 किलो, स्वेता अलकनूर – 44 किलो. संगमेश मडाळी – 55 किलो वेगवेगळ्या वजनी गटात सुवर्ण व रौप्य पदक थोडक्यात हुकले असले तरी पंजाब, हरियाणा, मणिपूर, दिल्ली व जम्मू-काश्मीर या राज्यांतील बलाढ्य प्रतिस्पर्ध्यां विरुद्ध त्यांनी जिद्द चिकाटी व निर्भय खेळाचे उत्कृष्ट प्रदर्शन केले.

विशेष उल्लेखनीय म्हणजे संगमेश याने दोन आंतरराष्ट्रीय पदक विजेत्यांवर मात करत खऱ्या खेळाडू ची जिद्द व विजेतेपदाची मानसिकता दाखवली. हे सर्व खेळाडू नेहरू नगर येथील डीवायसी इनडोअर हॉलमध्ये NIS प्रशिक्षक सौ. रोहिणी पाटील व सौ. कुतुजा मुलतानी यांच्या मार्गदर्शनाखाली सराव करतात. तसेच उपसंचालक श्रीनिवास बी.यांचे सातत्यपूर्ण सहकार्य लाभत आहे.त्यांचे यश हे कठोर परिश्रम, शिस्त व समर्पण याचे फलित असून त्यांनी कर्नाटक राज्य व बेळगाव जिल्ह्याचे नाव अभिमानाने उज्ज्वल केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!