Uncategorized
Trending

कॅन्टोन्मेंट मराठी प्राथमिक शाळेत विज्ञान प्रदर्शन 

बेलगाम प्राईड/विज्ञान विषय हा केवळ वाचनाचा नसून अनुभवातून समजणारा विषय आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना संकल्पना अधिक स्पष्ट व्हाव्यात आणि त्यांचा वैज्ञानिक दृष्टिकोन विकसित व्हावा या उद्देशाने राष्ट्रीय विज्ञान दिनाचे औचित्य साधून शाळेत विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले.

या प्रदर्शनाचे उदघाटन दै. पुढारीचे पत्रकार परशराम पालकर यांच्या हस्ते करण्यात आले. या कार्यक्रमाला शाळेचे ब्रँड अंबॅसिडर संतोष दरेकर, शिक्षण संयोजिका मॅरीलीन कोरिया,शाळेचे मुख्याध्यापक पी.एस.बिर्जे, शाळेचे शिक्षक व विद्यार्थी उपस्थित होते.

या प्रदर्शनात इयत्ता पहिली ते सातवीच्या विद्यार्थ्यांनी शालेय पुस्तकातील विविध प्रयोग प्रत्यक्षात साकार करून त्याबद्दल इतर विदयार्थ्यांना माहिती दिली.

उदघाटक पालकर म्हणाले कि प्रयोग प्रत्यक्ष पाहिल्याने मुलांची जिज्ञासा वाढते, प्रश्न विचारण्याची सवय लागते आणि विषय अधिक सोप्या व रंजक पद्धतीने समजतो. अशा पद्धतीने शिकताना मुलांचा सहभाग वाढतो, निरीक्षण व विचार करण्याची क्षमता विकसित होते आणि शिकलेले ज्ञान दीर्घकाळ लक्षात राहते.कॅन्टोन्मेंट शाळेत वर्षभर विविध प्रयोगांची प्रात्यक्षिके घेऊन विद्यार्थ्यांना अनुभवाधारित शिक्षण देण्यावर भर दिला जातो त्याबद्दल शाळेतील शिक्षकांचे त्यांनी कौतुक केले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिक्षक उदय पाटील यांनी केले. शाळेचे विज्ञान शिक्षक नीता गुंजीकर, राहुल कांबळे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.हे प्रदर्शन यशस्वी करण्यासाठी शाळेचे शिक्षक धनाजी कुरणे,श्रीकांत काटकर, तुषार कांबळे, मनीषा वड्डगोळ, रेणुका अंबी यांनी विशेष परिश्रम घेतले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!