Uncategorized
Trending

कार्यक्रमात हरविलेले दागिने पोलिसांनी त्या महिलेला परत केले 

बेलगाम प्राईड/ उद्यमबाग परिसरातील एका मंगल कार्यालयातून हरवलेले १५ ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने शोधून देऊन ते संबंधित महिलेला परत करण्यात आले.

शाहूनगर येथील सुनीता गोपाळ नारायणकर या लग्न समारंभासाठी उद्यमबाग येथील मंगल कार्यालयात आल्या होत्या. त्यांचे १५ ग्रॅमचे सुमारे २ लाख ५० हजार किमतीचे दागिने हरवले होते. सुनीता यांनी शोधाशोध करूनही दागिने न मिळाल्याने उद्यमबाग पोलिसात तक्रार दिली होती.

त्यानुसार पोलीस निरीक्षक डी. के. पाटील यांच्या नेतृत्वात पोलीस उपनिरीक्षक पी. जी. गंडेवगोळ व गुन्हे विभागाच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन सीसीटीव्ही फुटेज तपासले होते. फुटेजमुळे दागिने सापडल्यानंतर सदर महिलेला पोलीस स्थानकात बोलावून दागिने परत करण्यात आले. पोलीस उपनिरीक्षक गंडेवगोळ व तवनाप्पा कुंचनूर, मल्लिकार्जुन पात्रोट, इरण्णा चवलगी पोलीस आयुक्त भूषण गुलाबराव बोरसे, उपायुक्त नारायण बरमणी यांनी अभिनंदन केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!