Uncategorized
Trending

खानापूर नजीक अपघातात बी. के.कंग्राळीचे सहाजण जखमी

बेलगाम प्राईड/ देवदर्शन संपून येतेवेळी लोंढा महामार्गावर खानापूर नजीकच्या कुप्पटगिरी क्रॉस येथील पुलाच्या ठिकाणी कार चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने हा अपघात घडल्याची घटना रविवारी सायंकाळी चार वाजता घडली. या अपघातात कंग्राळी बी.के. येथील सहाजण जखमी झाले आहेत. याबाबत खानापूर पोलीस स्थानकात अपघाताची नोंद झाली असून अपघातातील जखमीवर बेळगाव येथील विजया हॉस्पिटल येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

बेळगाव तालुक्यातील कंग्राळी येथील काहीजण केए २२ एमए ६६०४ या कारने दांडेलीजवळील कवळे येथील शिवमंदिर दर्शनासाठी गेले होते. दर्शन घेऊन परत बेळगावला येताना खानापूरजवळील महामार्गावर कुप्पटगिरी क्रॉसवरील पुलावर कारवरील नियंत्रण सुटल्याने कार दुभाजकाला धडकून त्या ठिकाणी उभारण्यात आलेल्या फलकाला आदळली या अपघातात कारमधील सहा जण गंभीर जखमी झाले आहेत.

या भागातून जाणाऱ्या नागरिकांनी या सर्व जखमींना तातडीने मदत केली. त्यांना बेळगाव येथील विजया हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी हलविण्यात आले. या कारमधील प्रवास करणारे नितीश हुरुडे, ओमकार पाटील, परशुराम अष्टेकर,कपिल पाटील, नागराज पाटील, कुणाल हेब्बाळकर, सर्व राहणार कंग्राळी बी. के. हे जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. जखमींची प्रकृती धोक्याबाहेर असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!