Uncategorized
Trending

महाराष्ट्र राज्य येळ्ळूर’ फलक खटल्याप्रकरणी १९ आरोपींचे जबाब नोंद ५ जणांना वगळले

बेलगाम प्राईड/ ‘महाराष्ट्र राज्य येळ्ळूर’ या नामफलकाच्या खटल्यात आज बेळगाव येथील न्यायालयात महत्त्वपूर्ण सुनावणी पार पडली. यावेळी १९ आरोपींनी उपस्थित राहून आपले जबाब नोंदवले तर गैरहजर राहणाऱ्या ५ जणांना खटल्यातून वगळण्यात आले आहे.

सी.सी. क्रमांक १२६ अंतर्गत सुरू असलेल्या या खटल्याच्या सुनावणीसाठी अर्जुन नागप्पा गोरल, चांगदेव सातेरी देसाई, अनंत बरमाजी चित्ती, वृषेशन चंद्रकांत पाटील, संभाजी बाबुराव हट्टीकर, शिवाजी शंकर कदम, सुनील निंगाप्पा धामणेकर, श्रीकांत शिवाजी नांदुडकर, राहुल मारुती कुगाजी, नागेश सुभाष बोबटे, सुनील रामा कुंडेकर, रावलू महादेव कुगजी, केशव कृष्णा हलगेकर, गणपती इराप्पा पाटील, नामदेव विठ्ठल नायकोजी, केशव महादेव पाटील, रमेश जयराम धामणेकर, रामचंद्र नारायण कुगजी आणि सतीश मनोहर कुगजी हे १९ आरोपी न्यायालयात उपस्थित होते. यावेळी या सर्व आरोपींचे जबाब अधिकृतपणे नोंदवून घेण्यात आले.

या प्रकरणाच्या मागील सुनावणी वेळी परशराम मारुती कुंडेकर, गणेश ऊर्फ तांबडा नारायण पाटील, जयंत बाबू पाटील, सातेरी यल्लू बेळवतकर आणि रामचंद्र ईश्वर बागेवाडी हे पाच आरोपी वारंवार गैरहजर राहिले. या कारणास्तव न्यायालयाने या पाचही जणांची नावे या खटल्यातून वगळण्यात आली आहेत.

या प्रकरणाची कायदेशीर प्रक्रिया आता अंतिम टप्प्याकडे सरकत असून, यावर दोन्ही बाजूंचा युक्तिवाद होणे बाकी आहे. या खटल्याची पुढील सुनावणी ७ मार्च रोजी निश्चित करण्यात आली असून, त्या दिवशी न्यायालयासमोर सविस्तर युक्तिवाद होणार असल्याचे शामसुंदर पत्तार, शाम पाटील आणि हेमराज बेनचन्नावर यांनी सांगितले आहे..

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!