Uncategorized
Trending

महाशिवरात्रिने बेळगाव शहरातील शिवमंदिरे भाविकांनी गजबजली

बेलगाम प्राईड/ महाशिवरात्री निमित्त बेळगाव शहर आणि परिसरातील सर्व शिवमंदिरे भाविकांनी गजबजली होती. श्री क्षेत्र दक्षिण काशी म्हणून प्रसिद्ध असलेल्या श्री कपिलेश्वर मंदिरामध्ये पहाटेपासून धार्मिक विधी पार पडले. दुपारी विशेष होम व अभिषेक झाले ज्यामध्ये भाविकांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला.

सर्वत्र मिलिटरी महादेव, शंभूजत्ती बिस्किट महादेव, वीरभद्र देवस्थान, नेहरूनगर येथील बसवण्णा मंदिर, मल्लिकार्जुन देवस्थान (वडगाव), कॅम्प येथील महादेव गल्ली येथील श्री उमा रामेश्वर मंदिर, कणबर्गी येथील श्री सिद्धेश्वर मंदिर या ऐतिहासिक शिवालयांमध्ये विविध धार्मिक विधी पार पडले.

शिवालयांच्या प्रवेशद्वाराजवळ बेल, फुले, उदबत्ती नारळ कापूर यांसारख्या साहित्याची विक्री झाली, ज्यामुळे विक्रेतेही आनंदित झाले. शनिवारी मध्यरात्रीपासून रविवारी दिवसभर अभिषेक, रुद्राभिषेक, लघुरुद्राभिषेक, पंचामृताभिषेक, महाआरती आणि पूजन झाले.कपिलेश्वर मंदिराच्या परिसराला जत्रेचे स्वरूप प्राप्त झाले होते. संपूर्ण मंदिर विद्युत रोषणाई व फुलांपानांनी सजवलेले होते. यंदा नवीन कपिल तीर्थ तलावावर बारा ज्योतिर्लिंगांची रांगोळी विशेष आकर्षण ठरली.

तसेच मिलिटरी महादेव मंदिर येथे भक्तांनी आपापल्या चिमुकल्या नाही घेऊन गेले होते या ठिकाणी लहान मुलांसाठी खेळण्याची साहित्य खेळण्यांमध्ये बालवर्ग आनंदाने खुशीने झालेला दिसून येत होते.तसेच, विविध सामाजिक संस्था कडून दूध, पाणी आणि उपवासाचे हलके पदार्थ वाटप करण्यात आले. लाखो भाविकांनी दर्शन घेतले, ज्यामुळे शहरातील शिवमय वातावरण निर्माण झाले होते. भक्तांच्या गर्दीमुळे फुलून गेले होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!