Uncategorized
Trending

महसूल कर्मचाऱ्यांवर एफआयआर केल्याने संकेश्वर  उपनिरीक्षकांला जिल्हाधिकाऱ्यांकडून स्पष्टीकरणाची नोटीस

बेलगाम प्राईड/ महसूल विभागातील तीन कर्मचाऱ्यांविरुद्ध नोंदविण्यात आलेल्या एफआयआर प्रकरणी जिल्हाधिकारी कार्यालयाने संकेश्वर येथील पोलिस उपनिरीक्षकांकडून स्पष्टीकरण मागविले आहे. संबंधित प्रकरणात नियमबाह्य पद्धतीने गुन्हा दाखल केल्याचा उल्लेख करत त्वरित स्पष्टीकरण सादर करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

उपलब्ध माहितीनुसार, हुक्केरी तालुक्यातील संकेश्वर होबळी, कुरणी गाव येथील रि.स. क्र. १८३/१ब, क्षेत्रफळ १ एकर १३ गुंठे ८ आणे जमिनीच्या व्यवहारासंदर्भात १८ जानेवारी २०२४ रोजी उपनोंदणी अधिकारी, संकेश्वर यांच्या कार्यालयात खरेदीखत नोंदणी करण्यात आली होती. त्यानंतर ‘भूमी’ सॉफ्टवेअरद्वारे ग्राम लेखाधिकारी, कुरणी तसेच महसूल निरीक्षक, संकेश्वर यांनी म्युटेशन (नाव फेरफार) प्रक्रिया पूर्ण केल्याची नोंद आहे.

दरम्यान, या प्रकरणी २ ऑगस्ट २०२५ रोजी संकेश्वर पोलिस ठाण्यात ग्राम लेखाधिकारी प्रभाकर जी.जी. महसूल निरीक्षक ए.एम.कमतनूर तसेच ग्राम सहाय्यक भीमप्पा शंकर तळवार यांच्याविरुद्ध एफआयआर दाखल करण्यात आला आहे.

जिल्हाधिकाऱ्यांनी ६ फेब्रुवारी पाठवलेल्या पत्रात नमूद केले आहे. की म्युटेशनसारख्या प्रकरणांमध्ये अपील करण्याची कायदेशीर तरतूद उपलब्ध असताना थेट खासगी तक्रारीच्या आधारे एफआयआर नोंदविणे ही योग्य कार्यपद्धती ठरत नाही. तसेच कोणत्याही शासकीय कर्मचाऱ्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यापूर्वी नियुक्ती किंवा शिस्त प्राधिकरणाची पूर्वपरवानगी घेणे आवश्यक असते. या बाबींची पूर्तता न करता थेट एफआयआर नोंदविण्यात आल्याचे दिसून येत असल्याने याबाबत स्पष्ट स्पष्टीकरण परत टपालाद्वारे तातडीने सादर करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!