Uncategorized
Trending

नशेत असलेल्या युवकाकडून अंमली पदार्थांसह 1.21 लाखांचा मुद्देमाल जप्त

बेलगाम प्राईड/ गोगटे सर्कल नजीकच्या रेल्वे स्थानक रस्त्यावर नशेत असलेल्या एका युवकाला शहर गुन्हा अन्वेष विभागाच्या पोलिसांनी एकाला ताब्यात घेऊन त्याच्या जवळील 90 हजार रुपये किमतीच्या एमडीएमए या निद्राजन्य औषध असलेल्या अंमली पदार्थाच्या पावडरसह एकूण 1,21,900 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

पोलिसांनी अटक केलेल्या आरोपीचे नांव वर्धन आनंद कांबळे (वय 19) रा. जनता प्लॉट, पिरनवाडी बेळगाव असे आहे. वर्धमान याने दुसरा एक आरोपी अर्जुन तहसीलदार (रा. अनगोळ बेळगाव) याच्याकडून एमडीएमए हे बंदी असलेले निद्राजन्य औषध आणि भुकटी अर्थात पावडर घेतली होती.

त्यांचे सेवन करून तो नशेमध्ये गोगटे सर्कल जवळील रेल्वे स्थानक रस्त्याच्या ठिकाणी वावरत असल्याची माहिती मिळताच सीसीबी पोलीस निरीक्षक मंजुनाथ नायक व त्यांच्या सहकाऱ्यांनी घटनास्थळी दाखल होऊन वर्धन कांबळे याला ताब्यात घेतले.

तसेच त्याच्या जवळील 90,000 किमतीची 8.92 ग्रॅम एमडीएमए पावडर, 30,000 रुपये किमतीचा एक वन प्लस मोबाईल फोन आणि रोख 1,900 रुपये असा एकूण 1 लाख 21 हजार 900 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. या प्रकरणी कॅम्प पोलीस ठाण्यात वर्धन व अर्जुन या दोघांविरुद्ध गुन्हा नोंद झाला असून अधिक तपास सुरू आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!