Uncategorized
Trending

टीचर्स कॉलनीतील विहिरीच्या पुनरुज्जीवनाबद्दल प्यास फाऊंडेशन टीमचा सत्कार

बेलगाम प्राईड/ टीचर्स कॉलनी या भागातील पाण्यासाठी झटणाऱ्या नागरिकांना 150 वर्षे जुन्या संपूर्ण पडलेल्या विहिरीचे पुनरुज्जीवन करून ती भक्कमपणे उभी करून दिल्याबद्दल येथील श्री दत्त मंदिर सेवा समितीतर्फे प्यास फाउंडेशनच्या पदाधिकारी, सदस्यांचा सत्कार करून कृतज्ञता व्यक्त करण्यात आली.

बेळगावची प्यास फाऊंडेशन ही पाण्याचे संरक्षण व संवर्धनासाठी काम करणारी उत्तर कर्नाटकातील एक आघाडीची संस्था आहे. या संस्थेमार्फत आतापर्यंत लहान मोठे 13 तलाव व 4 विहिरी पुनर्जीवित करून पाण्याच्या बाबतीत लोकांना मोठा दिलासा देण्यात आला आहे. त्याचेच एक उदाहरण म्हणून टीचर्स कॉलनी श्री दत्त मंदिर येथील 150 वर्षे जुनी असलेली विहीर संपूर्ण पडलेली होती.

या विहिरीचे पुनरुज्जीवन केल्याबद्दल प्यास फाऊंडेशनचे अध्यक्ष डॉ. माधव प्रभू, सेक्रेटरी डॉ. प्रिती कोरे, खजिनदार लक्ष्मीकांत पसारी, सभासद रोहन कुलकर्णी, सूर्यकांत हिंडलगेकर यांना शाल, फुले व प्रसाद देऊन सन्मानित करण्यात आले. यावेळी डॉ. माधव प्रभू यांनी पाण्याचे महत्त्व पटवून दिले, तर डॉ. प्रिती कोरे यांच्यासह एकेपी फेरोकास्टचे पराग भंडारे व प्रीती भंडारे यानी विहिरीसाठी सहकार्य केल्या बद्दल स्थानिकांचे आभार मानले.

त्यानंतर प्यास फाउंडेशन टीमच्या हस्ते आरती करण्यात आली. यावेळी टीचर्स कॉलनी श्री दत्त मंदिर सेवा समितीचे के. सी. मोदी, वाय. एम. सुळेभावी, एस. एच. मधलूर, व्ही. आर. गुडी, एस. एन. तावरे, श्रीकृष्णा सराफ, सागर सुळेभावी, माधव देशपांडे, विनोद मात्तिकोप, श्रीनिवास भस्मे, गिरीश महाजन आदींसह इतर मान्यवर व कॉलनीतील रहिवाशी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!