Uncategorized
Trending

वडगाव परिसरात 24 तास शुद्ध पाण्याचे प्रयोग तत्वावर पाणीपुरवठा सुरू 

बेलगाम प्राईड / बेळगाव शहरात 24/7 पाणीपुरवठा योजनेची अंमलबजावणी करण्यासाठी प्रशासनाकडून प्रयत्न वेगाने सुरू असून, दक्षिण मतदारसंघातील वडगाव परिसरात गुरुवार, 12 फेब्रुवारीपासून प्रायोगिक तत्त्वावर पाणीपुरवठा सुरू करण्यात आला आहे. या योजनेची अंमलबजावणी टप्प्याटप्प्याने करण्यात येणार असून, भविष्यात संपूर्ण शहराला 24 तास शुद्ध पिण्याचे पाणी उपलब्ध करून देण्याचा उद्देश आहे.

यासंदर्भात बेळगाव दक्षिणचे आमदार अभय पाटील यांनी 24 तास पाणीपुरवठा सुविधा घेतलेल्या नागरिकांना पत्राद्वारे विशेष आवाहन केले आहे. दक्षिण विभागात अधिक घरांनी या योजनेअंतर्गत नळजोडणी करून घेतल्याची माहिती देण्यात आली आहे.

12 फेब्रुवारी 2026 पासून सुरू झालेल्या या उपक्रमांतर्गत पुढील तीन ते चार महिन्यांपर्यंत प्रायोगिक स्वरूपात दररोज दोन ते चार तास पाणीपुरवठा करण्यात येणार आहे. त्यानंतर आवश्यक तांत्रिक चाचण्या पूर्ण करून ही योजना नियमितपणे कार्यान्वित करण्यात येईल आणि शहरात 24 तास पाणीपुरवठा सुरू केला जाईल.

दरम्यान, महानगरपालिकेच्या पिण्याच्या पाण्याची आधीच नळजोडणी असलेल्या नागरिकांना नव्याने जोडणी घेण्यासाठी कोणतेही अतिरिक्त शुल्क आकारले जाणार नसल्याची माहितीही आमदार अभय पाटील यांनी पत्राद्वारे दिली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!