Uncategorized
Trending

बृहन्महाराष्ट्र मंडळ – नवी दिल्लीच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची देवास येथे त्रैवार्षिक निवडणूक

 

बेळगावचे नितीन वि. कपिलेश्वरी सह-कोषाध्यक्षपदी विजयी

बेलगाम प्राईड/ मध्य प्रदेशातील देवास येथे उत्साहात पार पडलेल्या बृहन्महाराष्ट्र मंडळ – नवी दिल्लीच्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या त्रैवार्षिक निवडणुकीत बेळगावचे  नितीन वि.कपिलेश्वरकर यांची सह-कोषाध्यक्षपदी भरघोस मतांनी निवड झाली.

देशभरातील प्रतिनिधींच्या उपस्थितीत ही निवडणूक पार पडली. मतदान प्रक्रियेनंतर जाहीर झालेल्या निकालात श् कपिलेश्वरी यांनी लक्षणीय मताधिक्य मिळवत विजय संपादन केला. त्यांच्या निवडीमुळे बेळगावसह सीमाभागात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.

नितीन कपिलेश्वरी हे सामाजिक, सांस्कृतिक आणि शैक्षणिक क्षेत्रात सक्रिय असून विविध उपक्रमांमध्ये त्यांचा उल्लेखनीय सहभाग आहे. संघटनात्मक कार्यातील त्यांचा अनुभव आणि कार्यतत्परता लक्षात घेता सह-कोषाध्यक्ष म्हणून ते प्रभावीपणे जबाबदारी पार पाडतील असा विश्वास व्यक्त केला जात आहे.

त्यांच्या विजयाबद्दल विविध स्तरांतून अभिनंदनाचा वर्षाव होत असून आगामी कार्यकाळासाठी त्यांना शुभेच्छा देण्यात आल्या आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!