Uncategorized
Trending

वयाच्या 100 व्या मृत्यूनंतर वैद्य डॉ. सुशीलादेवी  रामण्णावर यांनी अखेरच्या इच्छेनुसार देहदान केले 

बैलहोंगल / बैलहोंगल येथील बसवनगरमधील रहिवासी डॉ. रामण्णावर चॅरिटेबल ट्रस्टच्या अध्यक्षा तसेच शतायुषी आयुर्वेदिक वैद्य डॉ. सुशीलादेवी बसवण्णप्पा रामण्णावर (वय 100) यांनी आपल्या अखेरच्या इच्छेनुसार मृत्यूनंतरही जीवनाला अर्थ देत देहदान केले आहे.

डॉ. रामण्णावर चॅरिटेबल ट्रस्ट बैलहोंगल यांच्या माध्यमातून त्यांचा पार्थिव देह शैक्षणिक व संशोधन कार्यासाठी केएलई बी. एम. कंकणवाडी आयुर्वेदिक मेडिकल कॉलेज, शाहापूर, बेळगाव येथे दान करण्यात आले.

डॉ. सुशीलादेवी रामण्णावर या धाडसी आणि दूरदृष्टी असलेल्या महिला होत्या. त्यांनी देहदानाबाबत समाजात जागृती निर्माण करण्यासाठी प्रेरणादायी कार्य केले. सुमारे 18 वर्षांपूर्वी (13-11-2008) त्यांनी आपल्या पतींचा देह वैद्यकीय शिक्षणासाठी दान करण्यास कुटुंबीयांना प्रोत्साहन देत नैतिक बळ दिले होते. त्या घटनेमुळे वैद्यकीय क्षेत्रात जनजागृती व सेवेचा एक महत्त्वपूर्ण आदर्श निर्माण झाला.

डॉ. रामण्णावर चॅरिटेबल ट्रस्टच्या माध्यमातून त्यांनी डोळेदान, त्वचादान, देहदान आणि अवयवदान यासंदर्भातील गैरसमज व अंधश्रद्धा दूर करण्यासाठी राज्यात तसेच राज्याबाहेर अनेक जनजागृती कार्यक्रम आयोजित केले. या उपक्रमांमुळे हजारो महिला व नागरिकांना डोळे, त्वचा आणि देहदान करण्यासाठी प्रेरणा मिळाली.

यावेळी केएलई सोसायटीचे कार्याध्यक्ष डॉ. प्रभाकर कोरे आणि महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सुहासकुमार शेट्टी यांनी रामण्णावर कुटुंबीयांचे या उदात्त देहदान कार्याबद्दल आभार मानले.

उल्लेखनीय म्हणजे 18 वर्षांपूर्वी दिनांक 13-11-2008 रोजी ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिक आणि प्रसिद्ध दंततज्ज्ञ व आयुर्वेद तज्ज्ञ डॉ. बी. एस. रामण्णावर यांचा देहही बैलहोंगल येथे स्थापन केलेल्या डॉ. रामण्णावर चॅरिटेबल ट्रस्टच्या माध्यमातून केएलई आयुर्वेदिक मेडिकल कॉलेज, बेळगाव येथे वैद्यकीय शिक्षणासाठी दान करण्यात आला होता.

डॉ. सुशीलादेवी रामण्णावर यांच्या पश्चात तीन मुले, तीन मुली तसेच नातेवाईक व हितचिंतक असा मोठा परिवार आहे. मुले :डॉ. महांतेश बसवण्णप्पा रामण्णावर प्राध्यापक व विभागप्रमुख, शरीररचना (Anatomy) विभाग केएलई बी.एम. कंकणवाडी आयुर्वेदिक मेडिकल कॉलेज, बेळगाव सचिव – डॉ. रामण्णावर चॅरिटेबल ट्रस्ट, बैलहोंगल, जि. बेळगाव मो.: 9242496497

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!