
बेलगाम प्राईड/ शिक्षणामुळे महिलांसाठी विविध क्षेत्रात असंख्य संधी उपलब्ध झाल्या असून मुलींनी शिक्षण घेऊन स्वतःच्या पायावर उभे राहणे ही काळाची गरज बनली आहे. असे विचार समाजसेवक संतोष दरेकर यांनी मांडले. कॅन्टोन्मेंट मराठी प्राथमिक शाळेत आयोजित महिला दिन कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेचे मुख्याध्यापक पी. एस. बिर्जे होते.
कार्यक्रमाची सुरवात संगीत शिक्षिका रेणुका सरमळकर यांच्या स्वागत गीताने झाली. शाळेच्या शिक्षिका नीता गुंजीकर, मनीषा वड्डगोळ, रेणुका अंबी यांच्या हस्ते सरस्वती देवीच्या प्रतिमा पूजन झाले.यानंतर मान्यवरांचे स्वागत झाले.शाळेच्या काही विद्यार्थ्यांनी स्वरचित कविता दादर केल्या तर काही विद्यार्थ्यांनी आपले विचार व्यक्त केले.मनीषा वड्डगोळ यांनी महिलांचे कर्तृत्व याविषयी आपले विचार मांडले.यानंतर महिला शिक्षिका व महिला कर्मचारी यांना भेटवस्तू देण्यात आल्या.संतोष दरेकर यांनी शाळेतील सर्व विद्यार्थिनींना पेनचे वितरण करून महिला दिनाच्या शुभेच्छा दिल्या.
शाळेतील विद्यार्थिनींनी विविध क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या महिलांचे कर्तृत्व यावर नृत्य सादर केले. शाळेच्या महिला वर्गासाठी विविध स्पर्धाचे आयोजन करण्यात आले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शाळेची विद्यार्थिनी श्रेया लक्ष्मण गावडे हिने केले तर आभार नीता गुंजीकर यांनी केले.




