बेळगावात मराठा इन्फंट्री व जिल्हाधिकाऱ्यांनी बुधवारी सकाळी रंगपंचमी साजरी केली

बेलगाम प्राईड /बेळगाव शहरात देशाची सेवा बजावणारे लष्कर विभागाने व बेळगावचे जिल्हाधिकारी यांनी रंगपंचमी हा सण बुधवारी सकाळी साजरा केला.
मराठा इन्फंट्रीचे लष्करी जवान व वरिष्ठ अधिकारी ब्रिगेडियर यांनी गाण्याच्या तालावर नृत्य करत एकमेकास रंग लावून रंगपंचमीच्या शुभेच्छा देत रंगपंचमी हा सण लष्करी विभागाच्या ग्राउंडवर हा सण बुधवारी सकाळी मोठ्या उत्साहाने साजरा केला.

रंग खेळतेवेळी रंगपंचमीचे गाणी लावून यामध्ये सर्व जवानांनी मृत्यू केले यांच्या समवेत ब्रिगेडियर मुखर्जी तसेच कर्नल विनोद पाटील व त्यांच्या इतर वरिष्ठ अधिकाऱ्यांनी आपल्या सहकाऱ्यांसमवेत नृत्य करत हा रंगपंचमीचा सण मोठ्या उत्साहात आनंदात साजरा केला.
जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांनी आपल्या कुटुंबा समवेत तसेच आपल्या कार्यालयातील कर्मचाऱ्यांच्या समवेत आपल्या निवासस्थानी एकमेकाला रंग लावत हा रंगपंचमीचा कार्यक्रम साजरा केला. तसेच आपल्या कर्मचाऱ्यांच्या छोट्या बालकलाकारांच्या समवेत पाण्यामध्ये त्यांच्याशी खेळत एक मे काना रंग लावून रंगपंचमीचा आनंद उत्सव साजरा केला




