
बेलगाम प्राईड/ खासदार जगदीश शेट्टर यांची भारत ब्राझील संसदीय मैत्री गटाच्या सदस्य पदी निवड करण्यात आली आहे. लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला यांनी अठराव्या लोकसभेसाठी खास.जगदीश शेट्टर यांची निवड केली लोकसभा सचिवालयाच्या संचालकाकडून सदस्य पदी निवड झाल्याचे पत्र त्यांना देण्यात आले आहे. खासदार जगदीश शेट्टर यांनी या निवडीबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला यांचे आभार मानले आहे.




